VIDEO: रिक्षाचालकांच्या टोळक्याकडून पोलिसाला लाथा बुक्क्यांनी मारहाण

पाटणा: गेल्या काही दिवसांपासून पोलिसांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रात अशा अनेक घटना समोर आल्या. मात्र तिकडे गुन्हेगारांचं केंद्र असलेल्या बिहारमध्येही अशीच घटना घडली आहे. बिहारमध्ये एका रिक्षाचालक आणि त्याच्या मित्रांनी मिळून पोलिसाला बेदम मारहाण केली. या पोलिसाला लाथा, बुक्क्यांसह खाली पडेपर्यंत जोरदार मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे रिक्षाचालकाचं हे टोळकं विरुद्ध दिशेने येत होतं. …

VIDEO: रिक्षाचालकांच्या टोळक्याकडून पोलिसाला लाथा बुक्क्यांनी मारहाण

पाटणा: गेल्या काही दिवसांपासून पोलिसांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रात अशा अनेक घटना समोर आल्या. मात्र तिकडे गुन्हेगारांचं केंद्र असलेल्या बिहारमध्येही अशीच घटना घडली आहे.

बिहारमध्ये एका रिक्षाचालक आणि त्याच्या मित्रांनी मिळून पोलिसाला बेदम मारहाण केली. या पोलिसाला लाथा, बुक्क्यांसह खाली पडेपर्यंत जोरदार मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे रिक्षाचालकाचं हे टोळकं विरुद्ध दिशेने येत होतं. त्यावेळी या पोलिसाने त्यांना रोखल्याने ही मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे. बिहारमधील मुजफ्फरपूरच्या अघोरिया बाझार चौकात ही धक्कादायक घटना घडली.

या टोळक्याने इतकी बेदम मारहाण केली की, हा पोलीस खाली कोसळला. पोटात, छातीत, पायावर  अशा सर्व ठिकाणी लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यामुळे या पोलिसाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. संपूर्ण टोळकं एकट्या पोलिसाला बेदम मारहाण करत होतं. काही लोकांनी या टोळक्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पोलिसाला बेदम मारहाण केली.

याप्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, आरोपींच्या मुसक्या आवळण्याची तयारी सुरु आहे.

VIDEO: (व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह भाषेचा वापर)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *