AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाहांना भाजपचा झेंडा शेजारी देशात फडकवण्याची इच्छा, श्रीलंका म्हणतं तुमच्यासाठी दारं बंद

आमच्या निवडणूक कायद्यानुसार परदेशातील राजकीय पक्षांना इथे काम करण्याची मुभा नाही” असं श्रीलंकन निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं (BJP Amit Shah Sri Lanka )

अमित शाहांना भाजपचा झेंडा शेजारी देशात फडकवण्याची इच्छा, श्रीलंका म्हणतं तुमच्यासाठी दारं बंद
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Feb 16, 2021 | 12:58 PM
Share

कोलंबो : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह (Amit Shah) यांनी श्रीलंका (Sri Lanka) आणि नेपाळ (Nepal) पादाक्रांत करण्याची आरोळी ठोकल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यातच श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाने भारतातील राजकीय पक्षांसाठी देशाचे दरवाजे बंद असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. स्थानिक निवडणूक कायद्यानुसार परदेशी पक्षांना निवडणूक लढवण्याची परवानगी नसल्याचं श्रीलंकन निवडणूक आयोगाचे अध्यक्ष निमल पुंचीहेवा यांनी स्पष्ट केलं. (BJP Amit Shah cannot form political entity in Sri Lanka clarifies Election Commission chief)

“श्रीलंकेतील कुठल्याही राजकीय पक्ष किंवा संघटनेला परदेशातील पक्ष किंवा संघटनेची मदत घेण्याची परवानगी आहे. मात्र आमच्या निवडणूक कायद्यानुसार परदेशातील राजकीय पक्षांना इथे काम करण्याची मुभा नाही” असं श्रीलंकन निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं. अमित शाहांच्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रतिक्रियेला निमल पुंचीहेवा यांनी उत्तर दिलं.

अमित शाहांचा मानस काय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नेपाळ आणि श्रीलंकेसारख्या शेजारी देशांमध्ये भारतीय जनता पक्षाचा विस्तार करायचा आहे, असं वक्तव्य त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब (Tripura CM Biplab Deb) यांनी केलं होतं. भाजपला भारताच्या सीमा विस्तारुन विचार करायला हवा, असं अमित शाह यांनी त्रिपुरा दौऱ्यात सांगितल्याचं देब यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. रवींद्र सतबर्षिकी भवनात बिप्लब देब यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. अमित शाह यांचे नेतृत्व आणि भारताच्या सीमा उल्लंघून भाजपचा विस्तार करण्याच्या दृष्टीकोनाला देब यांनी दाद दिली.

अजून श्रीलंका आणि नेपाळ बाकी

‘जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाजपचे अध्यक्ष होते, तेव्हा ते त्रिपुरा राज्याच्या दौऱ्यावर आले होते. आमची एका गेस्ट हाऊसमध्ये भेट झाली. आम्ही गप्पा मारत होते. तेव्हा भाजपचे उत्तर-पूर्व झोनल सचिव अजय जमवालही होते. भाजपने अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापन केल्याचं जमवाल म्हणाले. तेव्हा अमित शाह म्हणाल होते, की अजून श्रीलंका आणि नेपाळ बाकी आहेत. आपल्याला शेजारी देशांमध्येही पक्षाचा विस्तार करायचा आहे. तिथेही विजय मिळवायचा आहे.’ असं मुख्यमंत्री बिप्लब देब भाजप कार्यकर्त्यांना सांगत होते.

आत्मनिर्भर दक्षिण आशिया

‘ज्यांच्याकडे इतकी ऊर्जा आहे, असा दृष्टीकोन आहे, ते बोलत आहेत की भाजपला जगभरात विस्तार करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या नेतृत्वात भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. असा विक्रम फक्त कम्युनिस्टांनी नोंदवला आहे.’ असंही बिप्लब देब म्हणाले. आत्मनिर्भर दक्षिण आशिया अभियानाअंतर्गत शाहांना पक्षविस्तार करायचा असल्याचं देब म्हणाले होते.

संबंधित बातम्या:

शिवसेना संपलीय किंवा संपवतो म्हणणाऱ्याला राऊतांचं थेट उत्तर, काँग्रेस नेते नाराज होणार?

त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणतात, अमित शाहांना भाजपचा पक्षविस्तार नेपाळ, श्रीलंकेतही हवा

(BJP Amit Shah cannot form political entity in Sri Lanka clarifies Election Commission chief)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...