AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममता बॅनर्जींना आणखी एक हादरा! TMC च्या बालेकिल्लात भाजपचा झेंडा, बंगालच्या राजकारणातून मोठी बातमी

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलता विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार देबांग्शु पांडा यांनी मोठा विजय मिळवला आहे. हा टीएमसीला मोठा धक्का मानला जात आहे.

ममता बॅनर्जींना आणखी एक हादरा! TMC च्या बालेकिल्लात भाजपचा झेंडा, बंगालच्या राजकारणातून मोठी बातमी
bjp wins falta assembly seatImage Credit source: Google
| Updated on: May 24, 2026 | 5:51 PM
Share

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलता विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार देबांग्शु पांडा यांनी मोठा विजय मिळवला आहे. ही जागा यापूर्वी तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला होती, मात्र आता यावर भाजपने झेंडा फडकवला आहे. या मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे आरोप झाले होते, त्यामुळे संपूर्ण मतदानच रद्द करून पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता.

1 लाखांपेक्षा जास्त मतांनी भाजपचा विजय

फलता विधानसभा मतदारसंघात पुनर्मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत भाजपने तब्बल एक लाख मतांच्या फरकाने विजय मिळवत टीएमसीला मोठा धक्का दिला आहे. या निकालानंतर पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा मतांची चोरी झाल्याचा दावा केला असून केंद्रीय सुरक्षा दलातील काही जवान भाजपचे एजंट बनून मतमोजणी केंद्रात गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

88 टक्के मतदान

फलता विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात असून तो टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे हा भाग टीएमसीचा बालेकिल्ला मानला जात होता. 29 एप्रिल रोजी येथे पहिल्यांदा मतदान झाले होते. मात्र मतदानादरम्यान ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड, बूथ कॅप्चरिंग आणि मतदारांना धमकावल्याचे गंभीर आरोप झाले. परिस्थिती इतकी बिघडली की निवडणूक आयोगाने संपूर्ण मतदारसंघातील मतदान रद्द केले. त्यानंतर 21 मे रोजी सर्व 285 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कडक सुरक्षाव्यवस्थेमुळे मतदान शांततेत पार पडले आणि 88 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली होती.

भाजप उमेदवाराची सुरुवातीपासून आघाडी

आज झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच भाजपचे देबांग्शु पांडा आघाडीवर होते. प्रत्येक फेरीनंतर त्यांची आघाडी वाढत गेली आणि अखेर त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. दुसऱ्या क्रमांकावर सीपीएमचे संभू नाथ कुर्मी राहिले, तर काँग्रेसचे अब्दुर रज्जाक मोल्ला तिसऱ्या क्रमांकावर होते. टीएमसीचे जहांगीर खान चौथ्या स्थानावर राहिले. विशेष म्हणजे पुनर्मतदानाआधीच जहांगीर खान यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती.

बंगालच्या राजकारणात खळबळ

दरम्यान, फलता मतदारसंघातील हा निकाल राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रभावक्षेत्रात भाजपने एवढ्या मोठ्या फरकाने विजय मिळवल्याने पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा निकाल ममता बॅनर्जी आणि टीएमसीसाठी मोठा राजकीय इशारा मानला जात आहे. आता आगमी काळात टीएमसी कसे पुनरागमन करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय.....
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय......
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते.....
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते......
महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?
महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?.
माझा अर्जच भरू दिला नाही! विजय पाटकर संतप्त; चित्रपट निवडणुकीचा नेमका
माझा अर्जच भरू दिला नाही! विजय पाटकर संतप्त; चित्रपट निवडणुकीचा नेमका.
ओबीसींच्या अन्नात माती कालवली! लक्ष्मण हाके आक्रमक; फडणवीस, जरांगे....
ओबीसींच्या अन्नात माती कालवली! लक्ष्मण हाके आक्रमक; फडणवीस, जरांगे.....
संजय गायकवाड अडचणीत! न्यायालयाचा मोठा आदेश; पोलीस चौकशीला हिरवा कंदील?
संजय गायकवाड अडचणीत! न्यायालयाचा मोठा आदेश; पोलीस चौकशीला हिरवा कंदील?.
NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा!
NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा!.
शिवतीर्थवर ठाकरेंच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन! त्या केकची होतेय चर्चा
शिवतीर्थवर ठाकरेंच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन! त्या केकची होतेय चर्चा.
ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल
ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल.
अंधश्रद्धेचा क्लास? मोटेगावकरचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल
अंधश्रद्धेचा क्लास? मोटेगावकरचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल.