सुहागरातलाच वधूने दिला घटस्फोट, निर्णयाने वराला मोठा धक्का, काय घडले नेमके

पोलिसांसमोर तासन तास चाललेल्या पंचायतीनंतर दोन्ही पक्षांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लग्नानंतर अवघ्या काही तासांत हे पती आणि पत्नीचे हे नाते कायदेशीररित्या संपले आणि वधू तिच्या माहेरी निघून गेली.

सुहागरातलाच वधूने दिला घटस्फोट, निर्णयाने वराला मोठा धक्का, काय घडले नेमके
| Updated on: Feb 23, 2026 | 7:49 PM

लग्नानंतर पहिल्या सुहागरात्री वधूने वराला ती नांदायला तयार नसल्याचे सांगितले आणि वराची धांदल उडाली. वधूने थेट पोलिस ठाणेच गाठले. त्यामुळे आता करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला. वधूने आपले लग्न जबरदस्तीने केले असल्याचा आरोप वधूने केला आहे.त्यामुळे वराने अखेर नशीबाला दोष देत तिच्या घरच्यांना आणि लग्न जुळवून देणाऱ्या दोष लावला आहे. काय झाले नेमके पाहूयात….

उत्तर प्रदेशातील हमीरपुर जिल्ह्यातील गोहांड कस्ब्यातून आपले माहेर सोडून सोमवारी सकाळी राठ येथे पोहचली. मात्र वधू मिथिलेश कुमारी हीने पती धरम सिंह याच्या सोबत राहण्यास नकार दिला. वधूने सकाळी होताच थेट राठ कोतवाली पोलिस ठाणे गाठले. आणि प्रियकरासोबत रहाण्याची इच्छा बोलून दाखविली. तिने तिच्या घरच्यांवर जबरदस्तीने लग्न लावल्याचा आरोप केला आहे.

Loading...

हे प्रकरण हमीरपूर राठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. बुद्ध सिंह यांची कन्या मिथिलेश कुमारी हीचा विवाह गोहांड याच्याशी झाली होती. लग्नाच्या विधी पूर्ण झाल्यानंतर ती पहिल्या रात्री तिच्या सासरी बुधौलियाना येथे पोहचले. तेथे एका खोलीत तिने नवऱ्याला सडेतोड उत्तर दिले. तिने सांगितले की तिचे प्रेम एका तरुणाशी होते. परंतू घरच्यांनी तिचे जबरदस्ती लग्न लावून दिले. त्यामुळे सकाळ होताच या विषय गावाच चर्चेचा झाला. आणि वधू पोलिस ठाण्याच उभी राहिली.

वधू आणि वर पक्षात मोठी खडाजंगी

वर धरम सिंह याला या घटनेचा धक्का बसला आहे. वराने म्हटले की तर वधूला लग्न मंजूर नव्हते तर तिने लग्न होण्याआधीच का नाही सांगितले. जर सत्य परिस्थिती आधीच माहिती असतील तर आपण स्वत:च तिच्याशी लग्न केले नसते. आता अशा प्रकारे लग्न तुटल्याने आपली बदनामी झाल्याचे वराने म्हटले आहे. राठ कोतवाली ठाण्यात वधू आणि वर पक्षात मोठी खडाजंगी झाली. आणि पंचायत भरली. अखेर कोतवाल राकेश सिंह म्हणाले की आपण वधूला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू वधू तिच्या म्हणण्यावर ठाम राहिली. अखेर कोणताच पर्याय नसल्याने दोन्ही पक्षांनी अखेर परस्पंर सहमतीने हे नाते संपवण्याचे ठरवले. अखेर घटस्फोट झाल्यानंतर वधू तिच्या नातलगांसोबत तिच्या माहेरी गेली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us