ज्ञानेश कुमार यांच्या मागेच लागली CJP, जामीनावर सुटताच सौरव दास यांची मोठी घोषणा

CJP New Agitation against Gyanesh Kumar: कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना जामीन मिळाला. बाहेर येताच त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दंड थोपाटले आहेत. लवकरच नवीन आंदोलनाची हाक ऐकू येऊ शकते.

ज्ञानेश कुमार यांच्या मागेच लागली CJP, जामीनावर सुटताच सौरव दास यांची मोठी घोषणा
ज्ञानेश कुमार यांच्या मागेच लागली CJP, जामीनावर सुटताच सौरव दास यांची मोठी घोषणा
| Updated on: Oct 22, 2026 | 7:24 AM

Sourav Das on Gyanesh Kumar: कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी त्यांना प्रत्येकी 50 हजारांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. तुरूंगातून बाहेर पडताच या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. लवकरच ते नव्या आंदोलनाची हाक देऊ शकतात.

ज्ञानू मस्ट गो

Loading...

न्यायालयीन कोठडी वाढवल्यानंतर सीजेपी नेत्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 9 दिवसांच्या तुरूंगावासानंतर दोन्ही नेते बाहेर आले. सौरव दास यांनी बाहेर पडताच सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. एक्सवर त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात पोस्ट केली. ज्ञानू मस्ट गो अशी घोषणा त्यांनी दिली. तर दुसरीकडे सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष आणि संयोजक अभिजीत दिपके यांनी दोन्ही नेत्यांच्या सुटकेनंतर लवकरच पक्षाची पुढील धोरणात्मक रणनीती आखली जाईल असे स्पष्ट केले. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात लवकरच आंदोलनाची हाक दिली जाऊ शकते. नेत्यांच्या सुटकेनंतर आंदोलन व्यापक होण्याची चिन्हं आहेत.

पक्षाचे पुढील मोठे आंदोलन कधी?

सध्या पक्षाने याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. त्यांच्या रणनीतीविषयीही अद्याप काही सांगितले नाही. अभिजीत दिपके यांच्या संकेतानुसार तीनही नेत्यांसह इतर सदस्यांची लवकरच एक बैठक होईल. यापूर्वी 10 ऑक्टोबर रोजी सीजेपीने दिल्लीत आंदोलनाची हाक दिली होती. पण तगडा पोलीस बंदोबस्त आणि नेत्यांच्या धरपकडीमुळे हे आंदोलन होऊ शकले नाही. 13 ऑक्टोबर आणि त्यानंतरचे तिरंगा आंदोलनही याच कारणाने होऊ शकले नाही. आता नवीन आंदोलन कधी होणार हे लवकरच समोर येईल.

दोन्ही नेत्यांना सशर्त जामीन

न्यायालयाने दोन्ही नेत्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यावेळी अटी आणि शर्ती घातल्या आहेत. त्यानुसार, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करता येणार नाही. जंतरमंतरवर आंदोलन करता येणार नाही. अधिसूचीत ठिकाणी आंदोलन करता येणार नाही. हमीपत्रावर दोघांची सुटका करण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us