आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंचं दिल्लीत उपोषण

नवी दिल्ली: तेलुगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या राज्याला विशेष दर्जा मिळावा यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. चंद्राबाबूंनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी दिल्लीतील आंध्र भवन इथं एक दिवसाचं उपोषण सुरु केलं आहे. मात्र त्यांच्या या आंदोलनापूर्वीच आंध्र भवनबाहेर एका व्यक्तीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. …

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंचं दिल्लीत उपोषण

नवी दिल्ली: तेलुगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या राज्याला विशेष दर्जा मिळावा यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. चंद्राबाबूंनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी दिल्लीतील आंध्र भवन इथं एक दिवसाचं उपोषण सुरु केलं आहे. मात्र त्यांच्या या आंदोलनापूर्वीच आंध्र भवनबाहेर एका व्यक्तीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

आत्महत्या केलेली व्यक्ती चंद्रबाबूंच्या आंध्रातीलच असल्याचं सांगण्यात येत आहे. आंध्रावरुन दिल्लीत येऊन या व्यक्तीने आत्महत्या केली.

आंध्राला विशेष राज्याचा दर्जा देणं आणि राज्य पुनर्गठन अधिनियम 2014 नुसार, केंद्र सरकारने दिलेली आश्वासनांच्या पूर्ततेसाठी चंद्राबाबूंनी उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्यासोबत टीडीपीचे अनेक नेतेही उपोषण करत आहेत. उपोषण सुरु करण्यापूर्वी चंद्राबाबूंनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.

मोदी सरकारची साथ सोडली
आंध्र प्रदेशातून तेलंगणा स्वतंत्र राज्य केल्यानंतर, चंद्राबाबूंनी आंध्रावर अन्याय झाल्याच्या भूमिकेतून भाजपप्रणित एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. चंद्राबाबू नायडू सोमवारी सकाळी आठ ते रात्री 8 पर्यंत आंध्र भवनात उपोषण करणार आहेत. त्यानंतर उद्या ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेणार आहेत.

काँग्रेसचा पाठिंबा
दरम्यान, चंद्राबाबूंच्या या उपोषणाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी स्वत: चंद्राबाबूंच्या भेटीला जाऊन त्यांच्याशी चर्चा केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *