CJP Delhi Protest : आंदोलन सुरु होण्याआधीच सौरभ भारद्वाजसह सीजेपीच्या अन्य नेत्यांना उचललं, बसमधून ‘जय भीम’, ‘जय भीम’ च्या घोषणा
CJP Delhi Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने आज मुंबई आणि दिल्ली येथे आंदोलनाची हाक दिली आहे. सीजेपीच्या आंदोलनाआधीच पोलिसांनी मोठी कारवाई केली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने आज मुंबई आणि दिल्ली येथे आंदोलनाची हाक दिली आहे. आज सकाळी सीजेपीने दिल्लीत जंतर-मंतर येथे आंदोलकांना बोलावलं होतं. पण आंदोलन सुरु होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी सीजेपीचे नेते सौरभ भारद्वाज आणि अन्य आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी तिथे मोठा गदारोळ, गोंधळ पहायला मिळाला. पोलिसांनी आंदोलकांना बसमध्ये भरलं. यावेळी मीडियाशी बोलताना आंदोलक बसमधूनच जय भीम, जय भीम च्या घोषणा देत होते. जब जब मोदी डरता हैं, पुलिस को आगे करता हैं अशा घोषणा हे सीजेपीचे आंदोलक देत होते. सौरभ भारद्वाज मीडियाशी बोलताना म्हणाले की, “पोलीस माझ्या घराबाहेरही उभे होते. रात्रभर SHO उभा होता. पण तुम्ही जंतर-मंतरवर या शांततापूर्ण पद्धतीने आपलं म्हणण मांडा” “रिक्षाने या, टॅक्सीने या, पायी चालत या पण या” असं या सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं.
आज मुंबईत दुपारी 4 वाजता सीजेपीच आंदोलन आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके स्वत: या आंदोलनाच नेतृत्व करणार आहेत. शिवाजी पार्क परिसरात होणाऱ्या या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी अजून परवानगी दिलेली नाही. मुख्य निवडणूक आयोगात मतभेद असल्याचं समोर आल्यानंतर देशातील विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. ते निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
दोन दिवसांनी ठाकरेंचा मोर्चा
आज कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आहे. दोन दिवसांनी 4 ऑक्टोंबरलाच ठाकरे बंधुंनी ज्ञानेश कुमार यांच्याच राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाची हाक दिली आहे. भायखळा क्रूडास कंपनी ते महापालिका मुख्यालयापर्यंत त्यांनी मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाला त्यांनी ‘गर्जना’ असं नाव दिलं आहे.
कोणाच्या फायद्यासाठी सुरू आहे?
“हे आंदोलन नाही. राजकारण आहे, कोणाच्या फायद्यासाठी सुरू आहे. झारखंडला जाऊन cjp ने सपोर्ट का केला नाही. cjp ला परमिशन नाही. भारतीय जनता पार्टीला आहे की नाही माहिती नाही” अशी टीका मंगलप्रभात लोढा यांनी केली.