Abhijeet Dipke : आता तुमच्याच ऑर्डर फॉलो करणार, अखेर अभिजीत दीपकेंनी क्लियर केलं, सांगितलं माझा नेता कोण?

आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना जामीन मिळाल्यानंतर सीजेपीने आनंद व्यक्त केला. न्यायालयीन कोठडीतून बाहेर येताच दीपके यांनी व्हिडीओ कॉल करून दास आणि रांका यांच्याशी बातचित केली. तसेच सोशल मीडियावर दोघेही बाहेर आल्याने आनंद व्यक्त केला.

Abhijeet Dipke : आता तुमच्याच ऑर्डर फॉलो करणार, अखेर अभिजीत दीपकेंनी क्लियर केलं, सांगितलं माझा नेता कोण?
abhijeet dipke and cjp
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 22, 2026 | 5:47 PM

CJP Abhijeet Dipke : कॉकरोच जनता पार्टीने अर्थात सीजेपीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी नवे आंदोलन उभारले आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर बंदी असताना घोषणाबाजी केल्याने सीजेपीचे सहसंयोजक आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. साधारण आठवड्याभरानंतर त्यांना जामीन मिळालाय. हा जामीन देताना या दोघांना अनेक अटी ठेवण्यात आल्या आहेत. असे असले तरीही त्यांनी बाहेर येताच पुन्हा एकदा ‘ज्ञानू मस्ट गो’ असं म्हणत आंदोलन सुरूच राहील, असे संकेत दिले आहेत. दरम्यान, आता सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनीही रांका आणि सौरभ दास यांना जामीन मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केलाय. तसेच त्यांनी एक ट्वीट केलंय. त्यांच्या या ट्वीटची सगळीकडेच चर्चा होतेय.

सीजेपीच्या आंदोलनाची पुढची दिशा काय?

आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना जामीन मिळाल्यानंतर सीजेपीने आनंद व्यक्त केला. न्यायालयीन कोठडीतून बाहेर येताच दीपके यांनी व्हिडीओ कॉल करून दास आणि रांका यांच्याशी बातचित केली. तसेच सोशल मीडियावर दोघेही बाहेर आल्याने आनंद व्यक्त केला. आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी जंतर-मंतरच्या गेटवरून उडी मारी तिथे तिरंगा फडकवत घोषणाबाजी केली होती. त्यांच्या या कृतीचेही अभिजीत दीपके यांनी एका प्रकारे कौतुक केले. हे दोघेही माझे नेते आहेत, असं मत दीपकेंनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर व्यक्त केलं. आता सीजेपी पुन्हा एकदा नव्या उत्साहाने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी नवे आंदोलन उभे करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे संकेतही सीजेपीने दिले आहेत.

Loading...

दीपके यांच्या ट्वीटमध्ये नेमकं काय आहे?

दीपके यांनी इंग्रजी भाषेत चार ओळी ट्वीट केल्या आहेत. या ट्वीटमध्ये दीपके यांनी सौरभ दास आणि आशुतोष यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. हे दोघेही माझ्यापेक्षा सरस आहेत. तसेच ते दोघेही माझ्यापेक्षा खूप खूप मोठे नेते आहेत. तुमचे आदेश पाळताना मला आनंदच होतो. तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, असं मत त्याने आपल्या ट्वीटमध्ये व्यक्त केलंय. तसेच भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्माच्या एका वाक्याचा संदर्भ घेत त्याने मजेशीर विधान केलेय. रोहित शर्मा आपल्या टीमच्या सदस्यांना गार्डनमध्ये फिरवण्यावरून बोलताना एक क्लीप व्हायरल झाली होती. तोच आधार घेत ‘यापुढे माझ्याशिवाय गार्डनमध्ये एकट्याने फिरायला जायचं नाही,’ असं मजेशीर विधान त्यानं ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केलंय. एका प्रकारे यापुढे कोणताही लढा लढताना मी तुमच्या सोबतच असेल असं, दीपके यांनी सुचवलंय. त्यामुळे आता सीजेपीच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us