CJP Protest Delhi LIVE : देशभरातील काँग्रेस कार्यालयांबाहेर आज भाजप आंदोलन करणार

CJP Protest Delhi LIVE Updates in Marathi : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलन दिल्लीत सुरू आहे. रात्रभर मुसळधार पाऊस झाला तरीही आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. आज मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

CJP Protest Delhi LIVE : देशभरातील काँग्रेस कार्यालयांबाहेर आज भाजप आंदोलन करणार
CJP Protest Delhi
| Edited By: | Updated on: Jul 22, 2026 | 10:04 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 22 Jul 2026 10:04 AM (IST)

    कल्याणहून CSMT च्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलमध्ये बिघाड

    कल्याणहून CSMT च्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलमध्ये बिघाड झाला आहे. दरवाजे बंद पडल्याने एकाच गेटवर प्रवाशांची झुंबड उडाल्याचं पहायला मिळालं. एकाच प्रवेशद्वारावर प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती देखील निर्माण झाली आहे.लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी धावपळ झाली. अखेर रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप करून दरवाजा बंद केल्यावर ही लोकल पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

  • 22 Jul 2026 09:47 AM (IST)

    आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी पंढरपुरात दाखल

    आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले असून चंद्रभागा नदीला पाणी आल्याने नदीपात्रात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि बुडणाऱ्या भाविकांचे जीव वाचवण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे. चंद्रभागा नदीपात्रात 17 बचाव बोटी आणि 230 प्रशिक्षित जवान रात्रंदिवस गस्त घालत आहेत. यामध्ये एनडीआरएफचे जवानही सहभागी असून नदीत उतरणाऱ्या प्रत्येक भाविकावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.


  • 22 Jul 2026 09:38 AM (IST)

    राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप करणार आंदोलन

    राहुल गांधी यांनी काल पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. तर आज भाजप राहुल गांधी यांच्या आंदोलनाला उत्तर देणार आहेत. राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर देखील भाजप आंदोलन करणार आहे…

  • 22 Jul 2026 09:35 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात.

    छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. ज्यामुळे सुकून जात असलेल्या पिकांना मिळाली नवसंजीवनी आहे. बळीराजा सुखावला मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मराठवाड्यात सरासरी 80 टक्के पेरण्या पूर्ण, रखडलेल्या पेरणीच्या कामाला पावसामुळे वेग येणार आहे.

  • 22 Jul 2026 09:25 AM (IST)

    काळपासून पावसाने चांगलीच हजेरी ठाण्यात लावली

    ठाण्यातील कोपरी परिसरातील बारा बंगला या ठिकाणी सखोल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवण्यास अडचण निर्माण होत आहे. ठाणे महानगरपालिकेकडून लावण्यात आलेला सक्षम पंप ठिकाणी एकही कर्मचारी कार्यरत नाही…त्यामुळे सक्षम पंप बंद असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही.


  • 22 Jul 2026 09:17 AM (IST)

    निफाड तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर; पशुपालकांची वाढली डोकेदुखी

    निफाड तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर; पशुपालकांसाठी वाढती डोकेदुखी ठरली आहे.  देवगावच्या शेतकऱ्याने कर्ज काढून बंदिस्त गोठा उभारला, गोठ्यात गायींसाठी पंख्यांची व्यवस्था करण्यात आली.  गोठ्यात हवा खेळती राहिल्याने गायीचे आरोग्य सुधारले, २५ गायींपासून दररोज २५० लिटर दूध उत्पादन होत आहे. बट्याच्या धोक्यात आधुनिक बंदिस्त गोठा पशुपालकांसाठी वरदान ठरतोय.

  • 22 Jul 2026 08:50 AM (IST)

    भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

    नाशिक विधान परिषद निवडणुकीतील कथित पैशांच्या वाटपाची भारत निवडणूक आयोगाने घेतली दखल. तक्रारीतील प्रत्येक मुद्द्याची सखोल चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित यंत्रणेला दिले आदेश. नाशिक विधान परिषद निवडणुकीत नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते यांच्यात झाली होती लढत. महायुतीकडे बहुमत असताना देखील गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांचा केला होता पराभव

  • 22 Jul 2026 08:40 AM (IST)

    कल्याण-डोंबिवलीत पावसाची संततधार; अधूनमधून जोरदार सरी

    कल्याण-डोंबिवलीत काल दुपारपासून पावसाचा ये-जा सुरूच, आजही सकाळ पासून ढगाळ वातावरण सह पावसाची संततधार कायम. अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्याने सखल भागात आणि रस्त्यांवर पाणी साचण्याच्या घटना. मात्र पावसाचा वेग कमी होताच पाण्याचा निचरा जलद गतीने होताना दिसत आहे. हवामान विभागाकडून पुढील काही तासांतही मुसळधार पावसाची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.

  • 22 Jul 2026 08:30 AM (IST)

    मुंबई उपनगरात पुन्हा मान्सूनची हजेरी, अनेक भागात पाऊस

    मुंबई उपनगरात मान्सूनने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. काल रात्री उशिरापासून कांदिवली, बोरीवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव आणि दहिसर परिसरात पाऊस सुरू आहे. हा टॉप अँगलचा व्हिडिओ कांदिवली परिसरातील आहे. येथे आकाशात काळे दाट ढग जमा झाले आहेत आणि सतत पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

  • 22 Jul 2026 08:25 AM (IST)

    गोंदियात संततधार पाऊस….

    गोंदिया जिल्ह्यात काल संध्याकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे…. या पावसामुळे जिल्ह्यातील धान पिकाला मोठा फायदा होत असून रोहिणीच्या वाढीला वेग आला आहे… मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतांमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे….. त्यामुळे शेतकरी समाधानी असून यंदा चांगल्या उत्पादनाची आशा व्यक्त करत आहेत…. हवामान खात्यानेही पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे……

  • 22 Jul 2026 08:20 AM (IST)

    चॉपरचा धाक दाखवत तरुणावर जीवघेणा हल्ला

    नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर-१९ येथील योगिता मेडिकलजवळ शिवसेना शाखेसमोर रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत दोन तरुणांनी तलवार व चॉपरचा धाक दाखवत एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात वाद मिटविण्यासाठी पुढे आलेल्या पीडिताच्या आईलाही डोक्यात मारहाण करण्यात आली.

  • 22 Jul 2026 08:15 AM (IST)

    रात्रभर पाऊस तरीही आंदोलकांनी सोडले नाही जंतर मंतर

    नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात आंदोलन सुरू आहे. देशभरातून तरूण या आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे. काल अनेक राजकीय नेत्यांनी या आंदोलकांची भेट घेतली. यादरम्यानच रात्रभर पाऊस झाला तरीही आंदोलकांनी जंतर मंतर सोडले नाही.

जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीविरोधात हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळतोय. आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे. विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यापासून हे आंदोलन अधिक चर्चेत आले. संसदेवर थेट मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. उद्धव ठाकरे, शरद पवार हे देखील विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आंदोलनस्थळी दाखल झाले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक ठाम आहेत. राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. जोरदार पाऊस सुरू आहे. आज भारतीय हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला. दिल्लीतील नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सरकारवर टीका केली जात आहे. यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा-मनोरंजन क्षेत्र आणि इतरही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..

Follow Us