दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

CJP Instagram Account : कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर भारतात तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. मात्र काही काळानंतर हे खाते पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?
cockroach janata party instagram account restored
Image Credit source: Google
| Updated on: Jul 22, 2026 | 7:19 PM

राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीकडून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. अशातच आता या आंदोलनातून मोठी बातमी समोर आली आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर भारतात तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. मात्र, पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ही बाब समोर आणल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हे खाते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नेमके काय घडले?

बुधवारी सायंकाळी CJP चे इन्स्टाग्राम खाते उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या युजर्सना हे खाते भारतात उपलब्ध नाही असा संदेश दिसत होता. इन्स्टाग्रामवर दिसत असलेल्या माहितीनुसार, कायदेशीर विनंतीनंतर हे खाते भारतात मर्यादित करण्यात आले होते. मात्र दे जगातील इतर देशांमध्ये सुरू होते.

अभिजीत दिपके यांचा दावा काय?

CJP चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पक्षाच्या इन्स्टाग्राम पेजचा स्क्रीनशॉट शेअर करत दावा केला की, कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम खाते नरेंद्र मोदी यांनी बंद केले आहे. मात्र, ही पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांतच त्यांनी आणखी एक स्क्रीनशॉट शेअर करत CJP चे इन्स्टाग्राम खाते पुन्हा सुरू झाल्याची माहिती दिली. त्यामुळे आता पुन्हा एकदा हे खाते सुरू झाले आहे.

राहुल गांधींचाही आंदोलनाला पाठिंबा

अभिजीत दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळत आहे. लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनीही मंगळवारी या आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ,‘धर्मेंद्र प्रधान हे एक सिम्बॉल आहे. विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने छळलं त्याचं सिम्बॉल आहे. त्यामुळे सिम्बॉल हटवला पाहिजे. आम्हाला ते माहीत आहे. त्यांची बॅकग्राऊंड माहिती आहे. आम्हाला देशाला संदेश द्यायचा आहे, अशा माणसाला हटवलं आहे. आम्हाला वाटतं हा मध्यवर्ती मुद्दा आहे. त्यावर निर्णय आला पाहिजे. आम्हाला बदल हवा आहे असं म्हणत प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Follow Us