काश्मिरी तरुणाला गाडीला बांधणाऱ्या मेजर गोगोईंचं कोर्ट मार्शल

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीदरम्यान सुरक्षित जाण्यासाठी काश्मिरी तरुणाला गाडीला बांधून नेणाऱ्या मेजर लितुल गोगोई यांचं कोर्ट मार्शल करण्यात आले आहे. मात्र, त्यांचं कोर्ट मार्शल तरुणाला गाडीला बांधून नेण्याच्या प्रकरणात नसून, श्रीनगर येथील हॉटेलमधील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्याच्या प्रकरणात झालं आहे. दिल्लीतील या प्रकरणात मेजर लितुल गोगोई दोषी आढळल्याने त्यांचं कोर्ट मार्शल करण्यात आलं. मेजर लितुल गोगोई यांची …

काश्मिरी तरुणाला गाडीला बांधणाऱ्या मेजर गोगोईंचं कोर्ट मार्शल

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीदरम्यान सुरक्षित जाण्यासाठी काश्मिरी तरुणाला गाडीला बांधून नेणाऱ्या मेजर लितुल गोगोई यांचं कोर्ट मार्शल करण्यात आले आहे. मात्र, त्यांचं कोर्ट मार्शल तरुणाला गाडीला बांधून नेण्याच्या प्रकरणात नसून, श्रीनगर येथील हॉटेलमधील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्याच्या प्रकरणात झालं आहे. दिल्लीतील या प्रकरणात मेजर लितुल गोगोई दोषी आढळल्याने त्यांचं कोर्ट मार्शल करण्यात आलं.

मेजर लितुल गोगोई यांची काश्मीरच्या बाहेर बदली  केली जाणार आहे. तसेच त्यांची सैन्यातील वरिष्ठता सहा महिन्यांनी कमी करण्यात आली आहे.

प्रकरण काय आहे?

मेजर लितुल गोगोई आणि त्यांच्या ड्राइव्हरने 23 मे 2018 रोजी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला होता. त्या प्रकरणी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. गोगोई त्यांच्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी हा सगळा घडला होता.

मेजर गोगोई आधीही चर्चेत

मेजर लितुल गोगोई हे एप्रिल 2017 मध्ये चर्चेत आले होते. काश्मीरमधील बडगाम येथे पोटनिवडणुकीच्या दरम्यान काही लोक दगडफेक करत होते. तेव्हा स्वतः वाचण्यासाठी मेजर गोगोई यांनी दगडफेक करणाऱ्यांपैकी एकाला गाडीच्या पुढे बांधले आणि स्वतःची गाडी पुढे घेऊन गेले होते. त्या तरुणाचा ढालीसारखा वापर मेजर गोगोई यांनी केला होता. त्यावेळी या घटनेची मोठी चर्चा झाली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *