सपना चौधरीच्या कार्यक्रमात राडा, चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

पाटणा : हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एकाचा मृत्यू झालाय, तर अनेकजण जखमी आहेत. बिहारमधील बेगूसराय येथे आयोजित करण्यात आलेल्या छठ पूजा महोत्सवात ही घटना घडली. सपनाला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यात चेंगराचेंगरी झाली आणि एकाचा …

, सपना चौधरीच्या कार्यक्रमात राडा, चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

पाटणा : हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एकाचा मृत्यू झालाय, तर अनेकजण जखमी आहेत. बिहारमधील बेगूसराय येथे आयोजित करण्यात आलेल्या छठ पूजा महोत्सवात ही घटना घडली. सपनाला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यात चेंगराचेंगरी झाली आणि एकाचा मृत्यू झाला.

सपना चौधरी ही तिच्या डान्ससाठी प्रसिद्ध आहे. 15 नोव्हेंबरला बेगूसरायमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सपनाची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. यावेळी अंदाजे 50 हजार लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. रात्री 12च्या दरम्यान सपना स्टेजवर आली ती स्टेजवर येताच सर्वत्र गोंधळ उडाला.

सपनाला जवळून पाहण्यासाठी चाहत्यांनी बॅरिगेट ओलांडल आणि ते स्टेजजवळ धावले. एकमेकांवर खुर्च्या फेकून मारायला लागले. यामुळे तेथे मोठा गोंधळ निर्माण झाला. सपना दोन गाण्यांवर डान्स करत कार्यक्रमातून निघून गेली. यावेळी गायक सुदेश भोसले आणि हंस राजही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

ही घटना बछवारा पोलीस स्टेशनच्या विभागातील आहे. येथे दरवर्षी छठ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, याआधीही अनेकदा सपनाच्या कार्यक्रमात असे प्रकार घडले आहेत. नुकतेच लखनौमधील एक कार्यक्रमही रद्द करण्यात आला होता.

सपना चौधरी महाराष्ट्राला समजली, जेव्हा तिला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला बोलावलं होतं. तिला पाहण्यासाठी परळीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पोलिसांना ही गर्दी आवरणंही कठीण झालं होतं. सपना चौधरीच्या नृत्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *