AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Blast: दिल्ली स्फोटाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर येताच खळबळ, डॉ. शाहीन शाहिदबाबत धक्कादायक खुलासा

Delhi Blast Maharashtra Connection: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत नवनवीन खुलासे व्हायला सुरुवात झाली आहे. आता महिला डॉक्टर शाहीन शाहिदचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे.

Delhi Blast: दिल्ली स्फोटाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर येताच खळबळ, डॉ. शाहीन शाहिदबाबत धक्कादायक खुलासा
DR Shaheen Maharashtra Connection
| Updated on: Nov 11, 2025 | 10:11 PM
Share

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत नवनवीन खुलासे व्हायला सुरुवात झाली आहे. दिल्ली स्फोटाचे कनेक्शन हे फरिदाबाद मॉड्यूलसोबत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी फरीदाबादमधून डॉक्टर जम्मिल शकील आणि लखनऊमधून डॉक्टर महिला शाहीन शाहिद हिला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. आता महिला डॉक्टर शाहीन शाहिदचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

शाहीन शाहिद जैश-ए-मोहम्मदशी संबंध

डॉक्टर शाहीन शाहिद जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखेच्या जमात उल मोमिनतची कमांडर होती. दशहतवादी मसूद अझहरची बहीण सादिया अजहर ही या संघटनेची पाकिस्तानमधील प्रमुख आहे. याचाच अर्थ डॉक्टर शाहीन ही थेट जैश-ए-मोहम्मदच्या दहशतावाद्यांशी जोडलेली होती. शाहिन शाहिदीच्या आलिशान कारमधून AK-47 रायफल आणि अनेक मॅगझिन जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता या प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा झाला आहे.

शाहीन शाहिदचं महाराष्ट्र कनेक्शन समोर

समोर आलेल्या माहितीनुसार, काही काळ मेडिकल कॉलेजमध्ये काम केल्यानंतर, शाहीनने 2013 साली महाराष्ट्रातील जफर हयातशी लग्न केले होते. मात्र 2015 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता. घटस्फोटापूर्वी काही काळ ती महाराष्ट्रात वास्तव्यास होती अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पोलीसांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच शाहिन महाराष्ट्रात नेमकी कुणाच्या संपर्कात होती याची चौकशी सुरू करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

एमबीबीएस स्टुडंटने केली पोलखोल

स्पेशल टास्क फोर्सने (STF) 30 ऑक्टोबर रोजी फरिदाबादच्या धौज परिसरातून अल-फलाह विद्यापीठातील एमबीबीएसचा विद्यार्थी डॉ. मुझमिल अहमद याला अटक केली होती. त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान मुझमिलने शाहिन शाहिदचे नाव घेतले. जेव्हा तिच्या आलिशान कारमध्ये AK-47 रायफल आणि अनेक मॅगझिन सापडल्या तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला. कारण कारची नंबर प्लेट डॉ. शाहिना यांच्या नावावर होती. शाहिना एका प्रतिष्ठित रुग्णालयात प्रॅक्टिस करत होती, ज्यामुळे तिच्यावर कोणालाही संशय आला नाही. आता एजन्सीकडून तिची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला