Delhi Earthquake : भल्या पहाटे भूकंप; गाढ झोपेत असताना बसले हादरे, नागरिक भयभीत
Delhi Earthquake : दिल्लीत भल्या पहाटे भूकंप झाला आहे. दिल्लीकर गाढ झोपेत असताना भूकंपाचे हादरे बसले आहेत.

दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारी पहाटे भूकंपाचे हादरे बसले आहेत. दिल्लीतील नागरिक गाढ झोपेत असताना भूकंप तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीच्या राजधानी उत्तर जिल्ह्यात होता. दिल्लीतील . या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.9 इतकी होती.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे. दिल्लीत 2 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजे रविवारी सकाळी 4 वाजून 14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची खोली ८ किलोमीटर इतकी नोंदवली गेली.खरंतर या भूकंपाची तीव्रता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारचा भूकंप हा मध्यम किंवा सौम्य मानला जातो. अशा भूकंपामुळे सहसा कोणतंही नुकसान होत नाही. जून महिन्यात देखील दिल्लीत भूकंप झाला होता. 27 जून रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भूकंप झाला होता. तर त्याचवेळी अफगाणिस्तानमध्येही 6.2 तीव्रतेचा भूकंप झाल्याचे समोर आले होते. त्याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर भारतातील इतर भागांवरही झाला होता.दिल्ली आणि त्याच्या आसपासचा परिसर भूकंपाच्या संवेदनशीलतेच्या झोन 4 मध्ये येत आहे. या प्रदेशात वारंवार सोम्य आणि मध्यम तीव्रतेचे भूकंप होत असातात. परंतु आज झालेल्या भूकंपाने कोणत्याही प्रकारची वित्तहानी झालेली नाही.
अरुणाचल प्रदेशमध्येही भूकंपाचे हादरे
दिल्ली व्यतिरिक्त इतर भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भल्या पहाटे झालेल्या भूकंपाची तीव्रता कमी होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नाशिकमध्ये 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. नाशिकमधील हा भूकंप रात्री 2 वाजून 37 मिनिटाला झाला होता. या भूकंपात कोणतीही जिवीतहानी आणि वित्तहानी झालेली नव्हती. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जपानमध्ये शक्तशाली भूकंप झाला होता. या भूकंपात जवळपास 18 जणांचा भूकंप झाला होता. या भूकंपाने संपूर्ण जपानमध्ये खळबळ उडाली होती.
भूकंपाच्या तीन श्रेणी
भूकंप हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते पृष्ठभागाखाली सुमारे 700 किलोमीटर येऊ शकतो. भूकंपाच्या खोलीची श्रेणी उथळ, मध्यम आणि खोल अशा तीन विभागामध्ये विभागली जाते.