CJP Protetst : सीजेपीला सर्वात मोठा धक्का, आशुतोष रांका, सौरभ दास कायद्याच्या कचाट्यात? दिल्ली पोलिसांचं मोठं पाऊल!

या दोघांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल केलाय. सध्या आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्यासह इतर सीजेपीच्या इतर कार्यकर्त्यांना जाफरपूर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.

CJP Protetst : सीजेपीला सर्वात मोठा धक्का, आशुतोष रांका, सौरभ दास कायद्याच्या कचाट्यात? दिल्ली पोलिसांचं मोठं पाऊल!
abhijeet dipke and ashutosh ranka and saurav das
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2026 | 9:41 PM

CJP Protetst : सीजेपीने दिल्लीत मोठे आंदोलन छेडले आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा, या एका मागणीसाठी सीजेपी पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे. विशेष म्हणजे यावेळी विरोधी बाकावर असलेल्या इंडिया आघाडीनेही चांगलाच आक्रमक पवित्रा धारण केलाय. एसआयआर प्रक्रियेत घोळ आहे, निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षाला फायदा मिळावा यासाठी काही निर्णय घेतले असे आरोप करण्यात येत आहेत. सीजेपीच्या या आंदोलनामुळे दिल्लीला एका प्रकारे छावणीचेच रुप आले आहे. सध्याची स्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करण्यास बंदी घातली आहे. याच बंदीनंतर आता दिल्ली पोलिसांनी सीजेपीचा चेहरा असलेल्या आशुतोष रांका तसेच सौरभ दास यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे.

आशुतोष रांका, सौरभ दास यांच्याविरोधात गुन्हा दाखल

दिल्लीत आंदोलन करण्यासाठी काही जागा नेमून देण्यात आलेल्या आहेत. अगोदर जंतर-मंतरवर आंदोलन करण्यास परवानगी होती. परंतु आता या जागांच्या यादीतून जंतर मंतरला वगळण्यात आले आहे. म्हणजेच या मैदानावर आता यानंतर आंदोलन करता येणार नाही. रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी मैदान या तीन जागांवर आंदोलन करण्यास परवानगी आहे. सध्या सीजेपीने आंदोलन छेडलेले आहे. असे असतानाच प्रशासकीय पातळीवर हा निर्णय घेण्यात आलाय. याच नियमाचे उल्लंघन केल्यामुळे सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Loading...

गुन्हा नेमका का दाखल झाला?

या दोघांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल केलाय. सध्या आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्यासह इतर सीजेपीच्या इतर कार्यकर्त्यांना जाफरपूर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. आंदोलन करताना सीजेपीचे समर्थक जंतर-मंतर मैदानात घुसले. त्यांनी मैदानात जाऊन घोषणाबाजी केली. आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलेले असतानाही घोषणाबाजी केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, या कारवाईनंतर सीजेपीतर्फे अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत, अशी सीजेपीची भूमिका आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us