AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Train Rule: दिवाळीत रेल्वेने प्रवास करणार असाल तर इकडे लक्ष द्या, ‘या’ 6 वस्तू सोबत नेण्यास मनाई

Indian Railways: तुम्हीही जर रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. यात प्रवाशांना प्रवास करताना ज्वलनशील पदार्थ सोबत न ठेवण्यास सांगण्यात आले आहे. कोणताही अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी ही विनंती केली आहे.

Train Rule: दिवाळीत रेल्वेने प्रवास करणार असाल तर इकडे लक्ष द्या, 'या' 6 वस्तू सोबत नेण्यास मनाई
Indian Railways
| Updated on: Oct 14, 2025 | 5:45 PM
Share

देशभरातील लोक दिवाळीची वाट पाहत आहेत. खासकरून शहरातील लोक दिवाळीला गावी जातात. यातील बहुतांशी लोक रेल्वेने प्रवास करतात. तुम्हीही जर रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. यात प्रवाशांना प्रवास करताना ज्वलनशील पदार्थ सोबत न ठेवण्यास सांगण्यात आले आहे. कोणताही अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी ही विनंती केली आहे. रेल्वे प्रवासात कोणते पदार्थ सोबत नेण्यास मनाई करण्यात आली आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

6 वस्तू घेऊन प्रवास करु नका

रेल्वे प्रशासनाने प्रवासादरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी 6 वस्तूंवर प्रवासादरम्यान बंदी घातली आहे. यात फटाके, रॉकेल, गॅस सिलिंडर, स्टोव्ह किंवा गॅस शेगडी, आगपेटी आणि सिगारेट या वस्तूंचा समावेश आहे. या सर्व वस्तूंमुळे स्फोट होण्याचा किंवा आग लागण्याचा घोका असतो. प्रवासादरम्यान असणारी गर्दी, कमी जागा यामुळे एक ठिणगीही आग पेटवू शकते, अशावेळी या वस्तू ट्रेनमध्ये असल्यास स्फोटाचा धोका निर्माण होतो. त्यामुळेच या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.

प्रवाशांची गर्दी वाढणार

दरवर्षी दिवाळीला रेल्वेत मोठी गर्दी पहायला मिळते. अनेकदा फॅमिलीसोबत प्रवास करणारे लोक बॅगा आणि सामानासह प्रवास करतात. यंदाही दिवाळीला अशीच गर्दी पहायला मिळण्याची शक्यता आहे. स्टेशनवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी दिल्ली, मुंबई, पटना अशा स्थानकांवर अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना सुखकर प्रवास करता येईल आणि प्लॅटफॉर्मवरील गर्दी मर्यादित राहण्यास मदत मिळणार आहे.

सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेकडून खास सूचना

  • संशयास्पद वस्तूंची सूचना पोलीसांना द्या: जर तुम्हाला स्टेशनवर किंवा रेल्वेत एखादी संशयित वस्तू दिसली तर त्याची सूचना त्वरित पोलीसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • मौल्यवान वस्तू सोबत ठेवा: रेल्वेत दिवाळीनिमित्त गर्दी असणार आहे, त्यामुळे मौल्यवान वस्तू सोबत ठेवण्याचे व त्यांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • कमी सामान सोबत ठेवा: दिवाळीला रेल्वेतून प्रवास करताना कमी सामान घेऊन प्रवास करण्याचा प्रयत्न करा.
  • ऑनलाईन पेमेंट: रेल्वे प्रवासात पैसे चोरी होण्याची भीती असते, त्यामुळे शक्यतो ऑनलाईन पेमेंट करा.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...