मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट…
डोनाल्ड ट्रम्प हे अनेकदा अचानक मोठे निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी जगभरात टॅरिफ वॉर सुरू केलं होतं. दरम्यान त्यानंतर आता त्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. ज्याचा भारताला मोठा फटका बसू शकतो.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा जगभरात टॅरिफ वॉर सुरू करण्याच्या तयारीमध्ये आहेत. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगभरात मोठी खळबळ उडून दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या घोषणेमुळे जागतिक बाजारात चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. जे देश रशियाकडून तेलाची खेरदी करतील त्या देशांवर आपण तब्बल 100 टक्के टॅरिफ लावणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या यादीमध्ये भारताचा देखील समावेश आहे. अद्याप याबाबत अमेरिकेनं कोणताही निर्णय घेतलेला नाहीये, परंतु ट्रम्प यांच्या नुसत्या घोषणेनं देखील त्याचे परिणाम जागतिक बाजारपेठेत पहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी आपल्या या नव्या घोषणेचं सर्व क्रेडिट त्यांचे निकटवर्ती अमेरिकेचे नेते दिवगंत डिंडसे ग्राहम यांना दिलं आहे.
ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलं?
जे देश अमेरिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी करतात त्या देशांना पुन्हा एकदा अडचणीत आणण्याची तयारी अमेरिकेनं सुरू केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलं आहे. अमेरिका लवकरच संसदेमध्ये असं विधेयक मंजूर करणार आहे, ज्यामुळे जे देश रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतील त्या देशांवर आम्ही शंभर टक्के टॅरिफ लावणार आहोत, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. खासदार लिंडसे ग्राहम यांचा सन्मान म्हणून अमेरिकेच्या संसदेमध्ये हे बील आणलं जाईल, असंही यावेळी ट्रम्प यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हे बिल मंजूर होईल अशी मला आशा आहे, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
जर अमेरिकेच्या संसदेमध्ये हे बील पास झालं तर याचा थेट अर्थ असा होतो की, जे देश रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतात, त्यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होणार आहे. यामध्ये भारत आघाडीवर आहे, कारण भारत आपल्या एकूण ऊर्जेच्या गरजेपैकी मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी रशियाकडून करतो. त्यामुळे भविष्यात भारतावर देखील अमेरिका 100 टक्के टॅरिफ लावण्याची शक्यता आहे, ज्याचा फार मोठा फटका हा भारताला बसू शकतो. रशियाचं गेल्या चार वर्षांपासून युक्रेनसोबत युद्ध सुरू आहे, युक्रेनसोबत सुरू झालेल्या युद्धानंतर अमेरिकेकडून रशियाच्या तेलावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे रशियाने देखील चीन आणि भारतासारख्या देशांना जे की कच्च्या तेलाचे सर्वात मोठे आयातदार देश आहेत, त्यांना सवलतीच्या दरात कच्चं तेल उपलब्ध करून दिलं होतं. मात्र अमेरिका आणि इराण युद्धानंतर रशियाने भारताला कच्च्या तेलाच्या खरेदीमध्ये देण्यात येणारी सवलत बंद केली असून, प्रिमियम दराने वसुली सुरू आहे.