डोनाल्ड ट्रम्प यांचा युटर्न, नव्या भूमिकेनं जगावर मोठं संकट, भारताला बसणार सर्वात मोठा फटका

मोठी बातमी समोर येत आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युटर्न घेतला आहे. अमेरिकेच्या नव्या धोरणामुळे आता जगावर मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा भारताला देखील मोठा फटका बसणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा युटर्न, नव्या भूमिकेनं जगावर मोठं संकट, भारताला बसणार सर्वात मोठा फटका
trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 24, 2026 | 9:30 PM

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अजूनही सुरू आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो भारताच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी दिल्लीत बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली होती. अवघ्या काही तासांमध्ये स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून जगासाठी गुड न्यूज समोर येईल असं त्यांनी म्हटलं होतं. तसेच स्ट्रेट ऑफ होर्मूज हा एक आंतरराष्ट्रीय मार्ग आहे, त्यामुळे इराण त्यावर आपला मालकी हक्क सांगू शकत नाही, आमचं आणि इराणचं बोलणं आता अंतिम टप्प्यात असून, सर्व पॉझिटिव्ह घडत आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला मोठा धक्का दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या वक्तव्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे गेल्या अनेक दिवसांपासून स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद आहे. यामुळे भारतासह जगातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. अमेरिकेच्या नेत्यांकडून ज्या पद्धतीचे दावे करण्यात येत होते, त्यावरून असा अंदाज बांधला जात होता की, आता लवकरच अमेरिका आणि इराणमध्ये करार होऊन स्ट्रेट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी सुरू होईल, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या भूमिकेमुळे या अपेक्षेवर देखील पाणी फिरलं आहे.

Loading...

नेमकं काय म्हणाले ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलं आहे. मला इराणसोबत करार करण्याची काहीही घाई नाहीये, बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात इराणसोबत अत्यंत बकवास अशाप्रकारची डील झाली होती, त्यामुळे पुन्हा अशीच डील व्हावी असं मला वाटत नाही. त्यामुळे मी या प्रकरणात कोणतीही घाई करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की इराणसोबत कराराबाबत आमची बोलणी आता अंतिम टप्प्यात आहेत, मात्र त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांचं जे स्टेटमेंट आलं आहे, त्यावरून असा अंदाज लावला जात आहे की, कदाचित पुन्हा एकदा ही बोलणी फिस्कटली असावीत, तसंच त्यांनी यावेळी हे देखील स्पष्ट केलं आहे, की जोपर्यंत इराणसोबतच्या फायनल डीलवर सही होत नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील नाकेबंदी मागे घेतली जाणार नाही. ट्रम्प यांच्या या विधानामुळे आता जगाचं टेन्शन पुन्हा एकदा वाढलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us