मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांना 440 व्होल्टचा झटका, टॅरिफनंतर पहिल्यांदाच भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, आता..

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये अशी त्यांची भूमिका आहे, मात्र या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांना 440 व्होल्टचा झटका, टॅरिफनंतर पहिल्यांदाच भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, आता..
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 21, 2025 | 8:51 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, याचा एक भाग म्हणून त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, तसेच नाटोचे सदस्य असलेल्या देशांनी देखील भारतावर टॅरिफ लावावा यासाठी त्यांनी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांना युरोपीयन संघाने मोठा धक्का दिला आहे. युरोपियन संघाकडून मुक्त व्यापार करारासंदर्भात भारताच्या नव्या धोरणात्मक अजेंड्याला मान्यता देण्यात आली आहे. तसेच भारत आणि युरोपियन संघ यांच्यामधील संबंध अधिक मजबूत कसे होतील यावर देखील यावेळी जोर देण्यात आला आहे.

भारत आणि युरोपियन संघामध्ये मुक्त व्यापार करारासंदर्भात चर्चा सुरू आहे. हा करार पूर्ण करण्यासाठी दोन्ही बाजूंनी काय-काय प्रयत्न करण्यात आले? यावर देखील यावेळी युरोपियन संघानं प्रकाश टाकला आहे. युरोपियन संघानं याबाबत बोलताना म्हटलं आहे की, संतुलित, महत्त्वाकांक्षी आणि एकमेकांना लाभदायी ठरू पाहाणाऱ्या मुक्त व्यापार कराराचं युरोपियन संघ स्वागत करतो. या वर्षाच्या शेवटी युरोपियन संघ आणि भारत यांच्यामधील मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरूप मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

रशिया, युक्रेन युद्धावर प्रतिक्रिया

दरम्यान भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी करतो आणि तो पैसा रशिया युक्रेनसोबतच्या युद्धात फंड म्हणून वापरतो असा डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप आहे. यावर देखील युरोपियन संघाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धासंदर्भात युरोपियन संघ भारतासोबत प्रत्येक पैलूंवर चर्चा सुरू ठेवेल अशी भूमिका युरोपियन महासंघाकडून घेण्यात आली आहे.

ट्रम्प यांना धक्का  

भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, त्यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेले आहेत. मात्र आता दुसरीकडे लवकरच मुक्त व्यापर करार अस्तित्वात येण्याची शक्यता असल्यानं हा ट्रम्प यांना मोठा धक्का मानला जात आहे.