व्वा! असं प्रत्येक शेतकऱ्यासोबत व्हावं; मुलाला साधा फोन घ्यायला गेला अन् पुढे थेट 3 लाखाची…; नेमकं काय घडलं?
मुलाला महागडा स्मार्टफोन घेऊन देण्यासाठी एका शेतकऱ्याने पैसे जमवले होते. दुर्गापूजेच्या काळात फोन खरेदी करताना त्याच्या नशिबाने असं काही वळण घेतलं की, बस्स.. नेमकं काय घडलं?

नशीबाला आपल्या जीवनामध्ये अनेकजण अनेकदा महत्त्व देतात. अनेकांचा नशीबावर विश्वास असतो तर काहींना अजिबात नसतो. पण कोणाचं नशीब फळफळलं तर काय होऊ शकतं याचा प्रत्यय येणारी एक घटना आता समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील एका शेतकऱ्याने मुलासाठी महागडा स्मार्टफोन खरेदी केला. मात्र, या खरेदीतून त्याला असं काही मिळालं, ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. दुर्गापूजेच्या काळात मुलाला गिफ्ट देण्यासाठी गेलेल्या या शेतकऱ्याला तब्बल 3 लाख रुपये किमतीची हार्ले डेव्हिडसन बाईक बक्षीस म्हणून मिळाली. हिरालाल घोष असं या शेतकऱ्याचं नाव असून, या अनपेक्षित बक्षिसामुळे त्याच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी साठवले होते पैसे
पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील बेलदा येथील हिरालाल घोष हे शेतकरी आहेत. त्यांच्या मुलाला महागडा स्मार्टफोन वापरण्याची इच्छा होती. मुलाची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी हिरालाल यांनी पैसे साठवले होते. दुर्गापूजेच्या काळात विविध ऑफर्स मिळतात, त्यामुळे या काळातच मुलासाठी फोन खरेदी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
त्यानुसार, त्यांनी 53 हजार रुपये खर्च करून एक स्मार्टफोन खरेदी केला. फोन खरेदी करताना काही सवलत मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, या खरेदीमुळे आपल्याला लाखोंची बाईक मिळेल, याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती.
फोन घेतला अन् नशीबच पालटलं
स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर हिरालाल घोष यांना 3 लाख रुपये किमतीची हार्ले डेव्हिडसन बाईक जिंकण्याची संधी मिळाली आणि त्यांचं नशीबच पालटलं. मुलासाठी फोन खरेदी करण्यासाठी गेलेल्या हिरालाल यांना एवढं मोठं बक्षीस मिळेल, यावर अजूनही विश्वास बसत नव्हता. दुर्गापूजेच्या काळात मिळालेल्या या अनपेक्षित भेटीला त्यांच्या कुटुंबाने देवी दुर्गेचा आशीर्वाद मानलं आहे.
या अनुभवाबद्दल बोलताना हिरालाल यांनी सांगितलं की, मुलासाठी फोन खरेदी करण्यासाठी ते दुर्गापूजेच्या काळात गेले होते. या काळात वेगवेगळ्या ऑफर्स मिळतात आणि काही पैसे वाचतील, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, सवलतीऐवजी एवढं मोठं बक्षीस मिळेल, याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती.