अविवाहित मुलींना मोबाईल बंदी, आंतरजातीय लग्न केल्यास पालकांना दंड, ठाकोरांचा फतवा

उत्तर प्रदेशातील बरेलीत भाजप आमदार राजेश मिश्रा यांच्या मुलीने दलित युवकाशी लग्न केल्याने, समाजातील एका वर्गाने प्रचंड टोकाची भूमिका घेतली.

अविवाहित मुलींना मोबाईल बंदी, आंतरजातीय लग्न केल्यास पालकांना दंड, ठाकोरांचा फतवा

गांधीनगर (गुजरात) : उत्तर प्रदेशातील बरेलीत भाजप आमदार राजेश मिश्रा यांच्या मुलीने दलित युवकाशी लग्न केल्याने, समाजातील एका वर्गाने प्रचंड टोकाची भूमिका घेतली. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात तर तुघलकी फर्मान काढण्यात आलं आहे. गुजरातमधील ठाकोर समाजाने अविवाहित तरुणींच्या मोबाईल वापरावरच बंदी घातली आहे. इतकंच नाही तर मुलीने पळून जाऊन आंतरजातीय लग्न केलं तर तिच्या आई-वडिलांवर मोठा दंड ठोठावण्यात येणार आहे.

बनासकांठा जिल्ह्यातील दांतीवाडा तालुक्यामधील 12 गावांतील ठाकोर समाजाने 14 जुलैला एक बैठक बोलावली होती. या बैठकीत हे फर्मान काढण्यात आलं.

याबाबत काँग्रेस आमदार गनीबेन ठाकोर यांच्या मते, “मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालण्यात काहीही गैर नाही. त्यांनी तंत्रज्ञानापासून दूर राहून शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवं”

या बैठकीतील फर्मानानुसार, अविवाहित तरुणींनी मोबाईल वापरु नये. जर त्यांच्याकडे मोबाईल फोन सापडला तर त्यांच्या आई-वडिलांना दोषी धरण्यात येईल. जर आंतरजातीय विवाह केला तर त्यांच्या पालकांना दीड ते दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल.

दांतीवाडा समाजाचा नेता सुरेश ठाकोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अविवाहित मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांनी शिक्षणावर लक्ष द्यायला हवं”

याशिवाय लग्नसोहळ्यांवर अनावश्यक खर्च कमी करण्याबाबतही या बैठकीत निर्णय झाला. डीजे, फटाके आणि मोठ्या वराती काढू नयेत, असंही या बैठकीत ठरलं.

लग्नाच्या अनावश्यक खर्चाबाबत घेतलेल्या निर्णयाचं आमदार अल्पेश ठाकरे यांनी स्वागत केलं आहे. मुलींच्या शिक्षणावर अधिक खर्च व्हावा असं आमदार अल्पेश ठाकोर म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *