मोदीजी, परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो, माजी सैनिकाचं पत्र

पुणे : पुलवामातील हल्ल्याचं उत्तर स्फोटकांनीच द्यावे लागेल, तरच पाकिस्तानला समजेल. पाकिस्तानचा नकाशाच जगाच्या नकाशावरुन हटवावा लागेल, तरच भारत आनंदात राहू शकेल आणि आता ती वेळही आली आहे, अशा आशयाचे पत्र भारतीय सैन्यातील माजी सैनिकाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धाडले आहे. तसेच, जर पाकिस्तानात जाऊन हल्ला करण्याची परवानगी मला देत असाल, तर मी जाण्यास …

मोदीजी, परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो, माजी सैनिकाचं पत्र

पुणे : पुलवामातील हल्ल्याचं उत्तर स्फोटकांनीच द्यावे लागेल, तरच पाकिस्तानला समजेल. पाकिस्तानचा नकाशाच जगाच्या नकाशावरुन हटवावा लागेल, तरच भारत आनंदात राहू शकेल आणि आता ती वेळही आली आहे, अशा आशयाचे पत्र भारतीय सैन्यातील माजी सैनिकाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धाडले आहे. तसेच, जर पाकिस्तानात जाऊन हल्ला करण्याची परवानगी मला देत असाल, तर मी जाण्यास तयार आहे, असेही या माजी सैनिकाने म्हटले आहे. कुशल महादेव घुले असे सैनिकाचे नाव आहे.

माजी सैनिक कुशल घुलेंनी मोदींना पाठवलेल्या पत्रात काय म्हटलंय?

मोदीजी, मी कुशल महादेव घुले (माजी सैनिक). मी 17 वर्षे सैन्यात देशसेवा केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांना कसं जगावं लागतं, याची मला चांगली माहिती आहे. पाकिस्तानने 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामात केलेल्या हल्ल्याला स्फोटकांनीच उत्तर द्यावे लागेल. पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुनच हटवावे लागेल. तरच भारत देश आनंदाने राहू शकतो. आता ती वेळही आली आहे. तुमच्यावर संपूर्ण देशाचा विश्वास आणि गर्व आहे, की तुम्ही पुलवामा हल्ल्याचा बदला नक्की घ्याल. सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो की, देशाच्या सुरक्षेसाठी आणि पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मोदींना साथ द्यावी.

मोदीजी, तुम्हाला विनंती करतो की, पाकिस्तानात जाऊन हल्ला करण्याची मला परावनगी दिल्यास, मी पाकिस्तानात जायला तयार आहे.

आपलाच माजी सैनिक

कुशल महादेव घुले

कुशल घुले कोण आहेत?

कुशल महादेव घुले हे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रहिवाशी आहेत. घुले यांनी भारतीय सैन्यात 17 वर्षे सेवा केली आहे. त्यांच्या पत्रात तसा उल्लेख आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातील नागरिकांच्या भावना संतप्त आहेत. तसेच, माजी सैनिकही संतापले आहेत. त्याच संतापातून माजी सैनिक कुशल घुले यांनी असे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. मात्र, यातील भावना या सर्व देशवासियांच्या आहेत. पाकिस्तानच्या भूमीवरुन दहशतवादी कृत्य काही केल्या थांबताना दिसत नाहीत. पुलवामा येथील हल्ला सुद्धा जैश-ए-मोहम्मद नावाच्या संघटनेने केला. या संघटनेची पाळंमुळं पाकिस्तानातच आहेत.

पुलवामा हल्ला

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे जवळपास 40 जवान शहीद झाले. दहशतवाद्यांनी हायवेवर उभ्या असलेल्या एका गाडीमध्ये आयईडी स्फोट केला आणि त्यानंतर सीआरपीएफच्या ताफ्यावर फायरिंग सुरु केली. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आल्याची माहिती आहे. काही जवान जागेवरच शहीद झाले, तर काही जवानांना उपचारासाठी नेताना ते शहीद झाले. ज्या ताफ्यावर हल्ला झाला, त्या ताफ्यामध्ये अडीच हजार जवान होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *