AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फाशीची शिक्षा होणारी भारतातील पहिली महिला; कोण आहे शबनम, तिचा गुन्हा काय?

2008 साली शबनमने आपल्या प्रियकराच्या मदतीने सात नातेवाईकांची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्दयीपणे हत्या केली होती. | Shabnam death penalty

फाशीची शिक्षा होणारी भारतातील पहिली महिला; कोण आहे शबनम, तिचा गुन्हा काय?
शबनमच्या फाशीची तारीख अद्याप निश्चित नसली तरी कोणत्याही क्षणी तिच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Feb 18, 2021 | 11:42 AM
Share

नवी दिल्ली: भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. तिचे नाव शबनम (First Indian Woman to be Executed) असे आहे. मथुरेतील तुरुंगात तिला लवकरच फाशी देण्यात येईल. त्यामुळे सध्या फाशीची शिक्षा झालेली शबनम आहे तरी कोण, अशी चर्चा रंगली आहे.  शबनम ही मूळची अमरोहाची आहे. मेरठमधील जल्लाद पवन तिला फास देताना खटका ओढेल. शबनमच्या फाशीची तारीख अद्याप निश्चित नसली तरी कोणत्याही क्षणी तिच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. (Shabnam first Indian women sentenced death penalty)

शबनमला फाशीची शिक्षा का झाली?

भारतात फाशीची शिक्षा होणे, ही खूपच गंभीर बाब मानला जाते. आतापर्यंत बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला यासारख्या कटातील गुन्हेगारांनाच फाशी देण्यात आली आहे. मात्र, शबनम ही स्वातंत्र्योत्तर काळात फाशीची शिक्षा देण्यात येणारी पहिली महिला ठरणार आहे. 2008 साली शबनमने आपल्या प्रियकराच्या मदतीने सात नातेवाईकांची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्दयीपणे हत्या केली होती. यामध्ये 10 महिन्यांच्या बाळाचाही समावेश होता. शबनम हिने कुऱ्हाडीने या सातही जणांचे शीर धडावेगळे केले. तिचा हा क्रूरपणा पाहून सर्वोच्च न्यायालयानेही शबनमची फाशीची शिक्षा माफ करण्यास नकार दिला होता.

मथुरेतील 150 वर्ष जुन्या वधस्तंभावर दिली जाणार फाशी

उत्तर प्रदेशात महिलांना फाशी देण्यासाठी केवळ एकच वधस्तंभ आहे. हे ठिकाण मथुरेत आहे. शबनमला फाशी देण्यासाठी औपचारिक प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे फाशीची तारीख अद्याप निश्चित होऊ शकलेली नाही. मात्र, डेथ वॉरंट जाहीर झाल्यानंतर शबनमला लगेच फाशी दिली जाईल, अशी माहिती वरिष्ठ तुरुंग अधीक्षक शैलेंद्र कुमार मैत्रेय यांनी दिली.

10 महिन्यांच्या बाळावरही कुऱ्हाडीचे घाव

अमरोहा येथे राहणाऱ्या शबनमच्या कुटुंबात तिचे वडील, आई, भाऊ, त्याची पत्नी आणि त्यांचे महिन्यांचे बाळ यांचा समावेश होता. शबनम गावातील सलीम नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. मात्र, हे संबंध तिच्या वडिलांना मान्य नव्हते. त्यामुळे घरच्यांनी शबनमला सलीमशी संबंध तोडायला सांगितले.

सुरुवातीच्या काळात सलीमला भेटता यावे म्हणून शबनम आपल्या घरच्यांना झोपेच्या गोळ्या देत होती. घरचे लोक गाढ झोपल्यावर सलीम आणि शबनम घराच्या छतावर एकमेकांना भेटत. मात्र, थोड्याच दिवसांमध्ये या दोघांनी घरच्यांना ठार मारण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. 14 एप्रिल 2008 च्या रात्री शबनमने सलीमला घरी बोलावले. त्यावेळी शबनमचे कुटुंबीय झोपेच्या गोळ्या खाल्ल्यामुळे गाढ झोपले होते. शबनम आणि सलीमने झोपेतच या सगळ्यांवर कुऱ्हाडीचे घाव घातले. यावेळी शबनमची एक लांबची बहीण राबिया हीदेखील त्यांच्या घरी आली होती. शबनमने तिलाहा ठार मारले. एवढेच नव्हे तर अवघ्या 10 महिन्यांच्या अर्श या बाळालाही शबनमने सोडले नाही. तिने कुऱ्डाडीचा घाव घालून या बाळाचे मुंडके छाटले.

(Shabnam first Indian women sentenced death penalty)

Follow Us
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर