Javed Akhtar vs Mufti Shamail Nadwi : ईश्वराच्या अस्तित्वावरुन जावेद अख्तर यांना भिडणारे मौलाना मुफ्ती शमाइल नदवी कोण आहेत?

Javed Akhtar vs Mufti Shamail Nadwi : ईश्वराचं अस्तित्व आहे का? या प्रश्नावर प्रसिद्ध शायर, गीतकार जावेद अख्तर आणि मौलाना मुफ्ती शमाइल नदवी यांच्यात एका यूट्यूब चॅनलवर जोरदार वादविवाद झाला. ही चर्चा सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

Javed Akhtar vs Mufti Shamail Nadwi : ईश्वराच्या अस्तित्वावरुन जावेद अख्तर यांना भिडणारे मौलाना मुफ्ती शमाइल नदवी कोण आहेत?
Javed Akhtar vs Mufti Shamail Nadwi
| Updated on: Dec 22, 2025 | 9:00 AM

Javed Akhtar vs Mufti Shamail Nadwi : गीतकार जावेद अख्तर आणि मौलाना मुफ्ती शमाइल नदवी यांच्यात ईश्वराच्या अस्तित्वावरुन एक यूट्यूब चॅनलवर झालेली डिबेट चर्चेमध्ये आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि युवा इस्लामिक स्कॉलर यांच्यात ईश्वराच्या अस्तित्वावरुन जोरदार वादविवाद झाला. ईश्वराचं अस्तित्व आहे का? हा चर्चेचा मुद्दा होता. हे इतकं मोठं ब्रह्मांड कोणी रचल्याशिवाय कसं अस्तित्वात येऊ शकतं? असा मुफ्ती शमाइल यांचा तर्क होता. या चर्चेनंतर अनेकांना हे जाणून घ्यायचं आहे की, मौलान मुफ्ती शमाइल नदवी कोण आहेत?.ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल आपले मुद्दे मांडून ते अचानक चर्चेत आले आहेत.

मौलाना मुफ्ती शमाइल नदवी एक इस्लामिक स्कॉलर, वक्ता आणि धर्मगुरु आहेत. ते मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. एका धार्मिक कुटुंबात जन्मलेल्या शमाइल यांचा कल बालपणापासून धर्म आणि ईश्वराकडे होता. ते केवळ एक मौलाना नाही, तर प्रभावशाली वक्ते आहेत. ते युवकांच्या भाषेत बोलतात. त्यांचा संबंध नदवा-ए-उलेमाच्या परंपरेशी मानला जातो. भारताच्या प्रतिष्ठित इस्लामिक शिक्षण संस्थेंमध्ये गणना होते.

एक प्रभावी आणि संतुलित वक्ता

मुफ्ती शमाइल नदवी यांना एक प्रभावी आणि संतुलित वक्ता मानलं जातं. त्यांच्या भाषणाच वैशिष्ट्य हे आहे की,ते कठिण धार्मिक विषय सुद्धा साध्या सरळ भाषेत मांडतात.

शिक्षण

मुफ्ती शमाइल नदवी यांनी इस्लामिक धर्मग्रंथांच सखोल अभ्यास केलेला आहे. धार्मिक मुद्यांवर ते तार्किक आणि शास्त्रीय तर्क मांडतात. ते ईश्वर, आस्था, नैतिकता आणि आधुनिक आव्हानांवर आपले मुद्दे मांडत असतात. त्यांनी प्रारंभिक आणि उच्च इस्लामी शिक्षण भारतातील प्रसिद्ध संस्थान दारुल उलूम नदवतुल उलेमा (लखनऊ) मधून पूर्ण केलय.

संतुलित विचार

इस्लामी धर्मशास्त्र, कुरान, हदीस आणि इस्लामी कायद्याचं सखोल ज्ञान आहे. आपले संतुलित विचार आणि तार्किक शोधासाठी ओळखले जातात.

धर्मार्थ ट्रस्टची स्थापना

ते मरकज़-अल-वहयैन नावाच्या एका ऑनलाइन शैक्षणिक संस्थेचे संस्थापक आणि प्रधानाचार्य आहे. त्या शिवाय त्यांनी 2024 मध्ये वहयैन फाउंडेशन नावाची एक धर्मार्थ ट्रस्टची सुद्धा स्थापना केली.

लोकप्रिय वक्ता

ते एक लोकप्रिय वक्ता आहेत. ते यूट्यूब आणि अन्य सोशल मीडिया प्लेटफार्मच्या माध्यमातून इस्लामी शिक्षेचा प्रचार करतात. ते अनेकदा नास्तिकत, विज्ञान आणि इस्लाम सारख्या विषयांवर तुलनात्मक चर्चा करतात. युवकांवर त्यांचा पगडा आहे. ते आपलं म्हणणं स्पष्तेनेट आणि अचूकतेने मांडतात.

चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाही

मुफ्ती शमाइल नदवी यांनी चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी सुद्धा त्यांनी धार्मिक विषयांवर आपली मतं मांडली आहेत. आधुनिक समाज, श्रद्धा आणि इस्लामशी संबंधित विषयांवर मत मांडल्यामुळे चर्चेत होते.