AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोमांसाच्या संशयावरुन झाडाला बांधून बेदम मारहाण

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा गोहत्येच्या संशयावरुन बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गोरक्षकांना गायीच्या मासांची तस्करीच्या संशयावरुन तरुणाला झाडाला बांधून मारहाण केली. या तथाकथित गोरक्षकांनी महिलेसह तीन जणांना बेदम मारहाण केली. सिवनी येथे ही धक्कादायक घटना घडली. हा व्हिडीओ दोन-तीन दिवसापूर्वीचा असल्याचे सांगितलं जात आहे. एका रिक्षातून काहीजण गोमांस घेऊन जाणार असल्याची माहिती या गोरक्षकांना […]

गोमांसाच्या संशयावरुन झाडाला बांधून बेदम मारहाण
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: May 25, 2019 | 1:07 PM
Share

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा गोहत्येच्या संशयावरुन बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गोरक्षकांना गायीच्या मासांची तस्करीच्या संशयावरुन तरुणाला झाडाला बांधून मारहाण केली. या तथाकथित गोरक्षकांनी महिलेसह तीन जणांना बेदम मारहाण केली. सिवनी येथे ही धक्कादायक घटना घडली. हा व्हिडीओ दोन-तीन दिवसापूर्वीचा असल्याचे सांगितलं जात आहे.

एका रिक्षातून काहीजण गोमांस घेऊन जाणार असल्याची माहिती या गोरक्षकांना मिळाली होती. त्यांनी संबंधितांना पकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओही शूट करण्यात आला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये लोक जय श्री रामचे नारे देताना दिसत आहेत.

मध्यप्रदेशातील डुंडा सिवनी येथील हा व्हिडीओ आहे. तीन लोकांकडे जे मांस मिळाले, गायीचे मांस असल्याचा संशय आहे. मात्र या कथित गोरक्षकांनी पोलिसांना सूचना न देता गुंडगिरी करत स्वत:च मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्या तरुणांकडून त्यांच्यासोबत असलेल्या महिलेलाही चपलेने मारण्यास सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. तसेच इतर आरोपींचा शोध सुरु असून अधिक तपास सुरु आहे. हा व्हिडीओ समोर आल्यावर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी ट्वीट करत भाजपावर निशाणा साधला.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली