जंतर मंतर वर ते बोलू शकत नव्हते, तरी त्यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला
सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. दिल्ली जंतर मंतरवर हे आंदोलन सुरू आहे. काल संसदेवर मोर्चा निघाला, यादरम्यान तणावाची स्थिती होती. आता या आंदोलनातील एक खास व्हिडीओ व्हायरल झाला.

सोनम वांगचुक यांचे दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर उपोषण सुरू होते. त्यांना पोलिसांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. पण त्यानंतर अभिजीत दिपके उपोषणाला बसले. काल संसदेवर त्यांचा मोर्चा होता. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नव्हती. तरीही अभिजीत दिपके आपल्या समर्थकांसोबत संसदेकडे निघाले. यादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण होते. नीट परीक्षेत मोठा घोटाळा झाला. त्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी झाली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर उपोषण अजूनही सुरू आहे. काल संसदेचे मुख्य गेट सुरक्षेच्या कारणावरून बंद करण्यात आले. पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. संसदेच्या सुरक्षेत थेट वाढ करण्यात आला. अजूनही आंदोलक उपोषणावर ठाम आहेत.
सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी देशभरातील तरूण तरूणी दिल्लीत दाखल झाले. आंदोलकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यादरम्यानच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. मनाला स्पर्श करणारा हा व्हिडीओ आहे. दिल्लीतील CJP च्या आंदोलनात काही दिव्यांग विद्यार्थीही सहभागी झाले.
यादरम्यान हे दिव्यांग विद्यार्थी सांकेतिक भाषेच्या माध्यमातून संवाद साधताना दिसले. उपोषणाबद्दलच्या आपल्या भाषा हे सांकेतिक भाषेतून व्यक्त करत होते. हे दृश्य या आंदोलनातील खरोखरच मनमोहक आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वारंवार बघितला जात आहे. एक विद्यार्थीनी पुढे दिसत आहे. आंदोलनात सहभागी होऊ ती सांकेतिक भाषेत संवाद साधताना दिसतंय.
यादरम्यान तिचा चेहरा बरेच काही सांगून जाताना दिसत आहे. दिव्यांग विद्यार्थी बोलू शकत नसले तरीही त्यांचा हा व्हिडीओ देशभरात व्हायरल होत आहे. बरेच दिव्यांग विद्यार्थी दिसत आहेत. नीट परीक्षेत मोठा घोटाळा झाला असून परीक्षेच्या काही दिवस अगोदरच पेपरफुटी झाली होती. 10 दिवस अगोदर काही विद्यार्थ्यांकडे पेपर उपलब्ध होती. काही जणांना या प्रकरणात अटकही केली. मात्र, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.