Heavy rains : दिल्लीला वादळाचा तडाखा; IMDचा चुकला अंदाज, का सांगू शकले नाही अंदाज? काय आहे कारण

| Updated on: Jun 01, 2022 | 3:13 PM

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मे-जूनच्या मान्सूनपूर्व महिन्यांत हवामानातील बदल समजणे फार कठीण असते. आयएमडीचे शास्त्रज्ञ आरके जेनामानी म्हणाले की, हवामान अंदाजाची विश्वासार्हता बहुतेक महिन्यांत 95 ते 100 टक्के असते. मात्र, मे आणि जून महिन्यात ते 80 टक्क्यांपर्यंत घसरते. याचे मुख्य कारण म्हणजे अस्थिर वातावरण.

Heavy rains : दिल्लीला वादळाचा तडाखा; IMDचा चुकला अंदाज, का सांगू शकले नाही अंदाज? काय आहे कारण
वादळी पाऊस
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : सोमवारी संध्याकाळी झालेल्या वादळ (Storms)आणि वादळी पावसामुळे दिल्लीत बरेच नुकसान झाले. शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक वाहने आणि बसही वादळाच्या तडाख्यात आल्या. ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, जणू सर्व काही घेऊन जाण्याच्या इराद्यानेच वाहत होते. तर ज्या हवामान खात्याने (meteorological department) या वादळासंदर्भात अंदाज वर्तवला तोपर्यंत वादळाने दिल्लीला तडाखा दिला होता. 2018 नंतर दिल्लीला (Delhi)तडाखा देणारे हे पहिलेच वादळ आहे. रविवारीच IMDने सोमवारी राजधानीत वादळाचा अंदाज वर्तवला होता आणि दिल्लीसाठी ‘ग्रीन अलर्ट’ जारी केला होता. तथापि, सोमवारी IMD ने दुपारी 3 च्या सुमारास ‘यलो’ अलर्ट जारी केला. त्यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास पुन्हा विभागाने ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता की, खबरदारीची कोणतीही उपाययोजना करता आली नाही. त्यातच हवामान खराब होण्याचा धोका नसतानाही IMD ने ग्रीन अलर्ट जारी केला.

हवामानातील बदल समजणे कठीण

तर यलो अलर्टमध्ये लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही हवामान आपत्तीपूर्वी लोकांना सावध करण्यासाठी आणि कोणत्याही परिस्थितीसाठी अगोदर तयार राहण्याचा सल्ला देऊन पिवळा अलर्ट जारी केला जातो. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मे-जूनच्या मान्सूनपूर्व महिन्यांत हवामानातील बदल समजणे फार कठीण असते. आयएमडीचे शास्त्रज्ञ आरके जेनामानी म्हणाले की, हवामान अंदाजाची विश्वासार्हता बहुतेक महिन्यांत 95 ते 100 टक्के असते. मात्र, मे आणि जून महिन्यात ते 80 टक्क्यांपर्यंत घसरते. याचे मुख्य कारण म्हणजे अस्थिर वातावरण.

वादळात अनेक जण जखमी

विशेष म्हणजे सोमवारी संध्याकाळी दिल्लीत झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे किमान 40 लोक जखमी झाले आहेत. वादळामुळे जखमी झालेल्या 15 जणांना दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एलएनजेपी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक सुरेश कुमार म्हणाले, ‘वाहनात असे 3 ते 4 रुग्ण होते आणि त्यादरम्यान त्यांच्या वाहनावर झाड पडले. त्यामुळे ते जखमी झाले. त्यांची हाडे तुटली.” ते म्हणाले की, वाहनांच्या विंडशील्ड किंवा खिडकीवर झाडं पडल्याने काही लोकांना दुखापतही झाली. तर काहींच्या डोक्याला दुखापत झाली आहे. मात्र, त्यापैकी एकाचीही प्रकृती चिंताजनक नाही. तसेच कुमार म्हणाले की, 15 पैकी सात रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात नैर्ऋत्य मॉन्सून वाऱ्याची अशी आगेकूच

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात श्रीलंकेत मान्सूनचे आगमन झाल्यानंतर 1 जून रोजी हाच मान्सून देशात आणि महाराष्ट्रात केरळातून दाखल होतो. आठवड्याभरात कोलकत्ता आणि मुंबई उपनगरात मान्सूनच्या सरी बरसल्या जातात. यंदा मात्र, 29 मे रोजीच मान्सूनचे आगमन हे केरळात झाले असून 5 जूनपर्यंत तो महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. 15 जुलैपर्यंत मान्सून वारे पूर्ण भारतात वाहू लागतात. तर सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरवात होते. ऑक्टोंबर पर्यंत सर्व भागातून मान्सून हा परतलेला असतो.