युद्धात इराण इस्रायलसमोर किती दिवस टिकू शकतो? कोणता देश अधिक पावरफूल? जाणून घ्या सैन्यबळ

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ला केला. मात्र जर हे युद्ध असंच सुरू राहिलं तर इराण इस्रायलसमोर किती दिवस टिकू शकतो असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जाणून घेऊयात दोन्ही देशांच्या सैन्यबळाबद्दल.

युद्धात इराण इस्रायलसमोर किती दिवस टिकू शकतो? कोणता देश अधिक पावरफूल? जाणून घ्या सैन्यबळ
Iran Israel War
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 28, 2026 | 3:56 PM

इस्त्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केला आहे. इस्रायल आणि अमेरिकेनं थेट इराणची राजधानी तेहरानवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. इराणकडून हल्ला होण्याची शक्यता होती, त्यामुळे संभाव्य हल्ला रोखण्यासाठी आम्ही इराणवर हल्ला केल्याचं इस्रायलने म्हटलं आहे. तर दुसरीकडे आता इराणने देखील मोठी कारवाई केली आहे, समोर आलेल्या माहितीनुसार जवळपास सात पेक्षा अधिक अमेरिकेच्या नौदल तळांवर इराणकडून हल्ला करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार इस्रायलकडून इराणच्या तेहरान, इस्फहान, कोम आणि खोर्रमाबाद या शहरांवर मिसाईल हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायलकडून इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला खामेनेई यांच्या घराला देखील टार्गेट करण्यात आलं आहे. मात्र सध्या अयातुल्ला अली खामेनेई हे इराणच्या राजधानीमध्ये नसून, त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

सैन्यबळ

मात्र या सर्वांमध्ये आता असा एक प्रश्न उपस्थित होत आहे की, इराणची सैन्य शक्ती किती आहे? आणि इराण या युद्धामध्ये इस्रायलसमोर किती दिवस टिकू शकते? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर समजून घेऊयात. इराण आणि इस्रायलच्या सैन्याची तुलना करायची झाल्यास एका रिपोर्टनुसार इस्रायलपेक्षा इराणकडे सैन्यबळ अधिक आहे. इराणकडे सध्या परिस्थितीमध्ये 6 लाख सक्रिय सैनिक आहेत, तर 3.5 लाख राखीव सैनिक आहेत. इस्रायलकडे अवघे 1.7 लाख सक्रिय सैनिक आहेत, तर 4.5 लाख राखीव सौनिक आहेत, या राखीव सौनिकांना विशेष प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे, त्यामुळे वेळ पडल्यास हे सैनिक इस्रायल कोणत्याही युद्धात वापरू शकतो.

हवाई दल

जर हवाई दलाबाबत बोलायचं झाल्यास, इस्रायलकडे 600 पेक्षा अधिक अत्याधुनिक फायटर जेट आहेत. ज्यामध्ये एफ-35 सारख्या विमानांचा समावेश आहे. या विमानांचं वैशिष्ट म्हणजे हे विमानं रडारला हुलकावणी देण्यास सक्षम आहे. तर दुसरीकडे इराणकडे देखील 500 पेक्षा जास्त लढाऊ विमान आहेत, मात्र त्यांची विमान ही जुनी आहेत, त्यामुळे या पातळीवर इस्रायल इराणपेक्षा कितीतरी पटीनं पुढे आहे.मात्र इराणची सर्वात मोठी ताकद ही त्यांच्या लांब पल्ल्याच्या मिसाईल आहेत, या मिसाईलची दहशत इस्रायल आणि अमेरिकेमध्ये सुद्धा आहे.

Follow Us