दोन-तीन दिवस ढाराढूर झोपलो आणि नंतर… तिहार तुरुंगातील भन्नाट अनुभव, CJP नेते आशुतोष रांका यांनी सांगितले की…
Abhijeet Dipke Ashutosh Ranka Sourabh Das : जंतरमंतरवरील आंदोलनानंतर सौरव दास आणि आशुतोष रांका यांची तिहार तुरूंगात रवानगी करण्यात आली होती. तिथला भन्नाट अनुभव त्यांनी शेअर केला आहे.

Ashutosh Ranka on Tihar Jail: दिल्लीत 13 ऑक्टोबर रोजी जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा प्रयत्न आणि हमीपत्राचे उल्लंघन केल्यावरून सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यांना तिहार तुरूंगात ठेवण्यात आले होते. जेलमध्ये राहण्याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे. त्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
अगोदरचे दोन-तीन दिवस मस्त दिली ताणून
एका मुलाखतीत आशुतोष रांका यांनी तुरूंगातील अनुभव शेअर केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर ते रात्र रात्रभर जागे होते. यामुळे त्यांना मोठा थकवा आला होता. तिहारमध्ये पोहचताच मग त्यांनी गेल्या गेल्याच मस्त ताणून दिली. म्हणजे ते गाढ झोपले. त्यांनी सुरूवातीचे दोन ते तीन दिवस झोप काढण्यातच घालवले. अगोदर नीट झोप झालेली नव्हती. तुरूंगात पोहचल्यावर त्यांनी हा झोपेचा कोटा पूर्ण केला, असे मिश्किलपणे त्याने सांगितले.
तिहार म्हणजे डिजिटल डिटॉक्स
आजच्या युगात स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांना रांका यांनी एक भन्नाट किस्सा सांगितला. कॉकरोच हा नेहमी ऑनलाईन आणि डिजिटल मीडियावर सक्रिय असतो. पण तिहारमध्ये गेल्यावर मोबाईल आणि सोशल मीडियाचा थांगपत्ता उरला नाही. त्या 8 दिवसांचा आम्ही पुरेपुर फायदा उचलला. या काळात झोप झाली. मन:शांती मिळाली. तिथले वातावरण अनुभवता आले. मोबाईलपासून दूर असल्याने एक वेगळीच अनुभुती मिळाल्याचे रांका यांनी सांगितले.
गुन्हाच केला नाही तर मग भीती कसली?
जर तुम्ही कोणताच गुन्हा केला नसेल तर तुम्हाला भीती वाटण्याचं कारण नाही. तुरूंगाला तर अजिबात घाबरण्याचे काम नाही. तिथं पोहचल्यावर दोन दिवसांनी पुस्तकं वाचायला घेतली. त्यात वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही. या काळात तुरूंगातील सोयी-सुविधांविषयीची माहिती त्यांनी दिली. तिहारचे अन्न आणि सुरक्षा व्यवस्थेची आशुतोष रांका यांनी कौतुक केले. त्याच्या या दिलखुलास वक्तव्यावर नेटिझन्सकडून कमेंटचा पाऊस पडला.