वयाच्या 38 व्या वर्षी पंतप्रधानांचे खाजगी सचिव, कोण आहेत विवेक कुमार?

इंडियन फॉरेन सर्व्हिस (IFS) विवेक कुमार (IFS Vivek Kumar) यांची 19 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव (Private Secretary to PM) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

वयाच्या 38 व्या वर्षी पंतप्रधानांचे खाजगी सचिव, कोण आहेत विवेक कुमार?
Follow us
| Updated on: Jul 19, 2019 | 9:29 PM

नवी दिल्ली : इंडियन फॉरेन सर्व्हिस (IFS) विवेक कुमार (IFS Vivek Kumar) यांची 19 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव (Private Secretary to PM) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मोदींच्या पहिल्या कार्यकाळातही विवेक कुमार यांनी पीएमओमध्ये काम केलं होतं. वयाच्या 38 व्या वर्षी पंतप्रधानांचे खाजगी सचिव होण्याचा मान विवेक कुमार यांना मिळालाय.

कोण आहेत विवेक कुमार?

विवेक कुमार यांनी 1998-2002 या काळात आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. आयआयटीमधून बीटेक केल्यानंतर विवेक कुमार यांनी यूपीएससीत नशिब आजमावलं आणि आयएफएस पोस्ट मिळवली. आयएफएस म्हणून त्यांनी भारतासह परदेशातही विविध पदांवर काम केलंय. लिंक्डइननुसार त्यांचा जन्म सप्टेंबर 1981 मध्ये झाला. वयाच्या 38 व्या वर्षीच त्यांनी एक वरिष्ठ अधिकारी म्हणून मान मिळवलाय. विवेक कुमार यांनी बीटेकनंतर बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून एका टेलिकॉम सॉफ्टवेअर स्टार्टअपमध्ये काम केलं.

विवेक कुमार 2004 मध्ये परराष्ट्र सेवेत रुजू झाले. खाजगी सचिव नियुक्त होण्यापूर्वी विवेक कुमार यांनी जवळपास पाच वर्ष म्हणजे डिसेंबर 2014 पासून पीएमओमध्ये संचालक पदावर काम केलं. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात Deputy chief of Protocol (Ceremonials) पदावर जुलै 2013 ते 2016 पर्यंत काम पाहिलं. विवेक कुमार यांनी सिडनीत भारताचे वाणिज्य दूत (Consulate General) म्हणून विविध पदांवर काम पाहिलं. भारतात माहिती अधिकार कायदा 2005 लागू करण्यात विवेक कुमार यांचं मोठं योगदान मानलं जातं. रशियामधील भारतीय दुतावासातही विवेक कुमार यांनी मोठ्य पदावर काम केलं. रशियात काम करण्यापूर्वी त्यांनी सहा महिने अगोदर रशियन भाषेचंही प्रशिक्षण घेतलं. मोदी सरकारच्या काळात एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनी ओळख मिळवली.

इतर महत्त्वाची पदं

पहिल्या मोदी सरकारमध्ये मुख्य सचिव राहिलेले नृपेंद्र मिश्र यांना पुन्ही तिच जबाबदारी देण्यात आली आहे. नृपेंद्र मिश्र 1967 च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. यूपी केडरचे अधिकारी नृपेंद्र मिश्र यांनी उत्तर प्रदेशात मुलायम सिंह आणि कल्याण सिंह यांच्यासाठी मुख्य सचिव म्हणून काम पाहिलंय. नृपेंद्र मिश्र तीन विषयांमध्ये मास्टर्स आहेत. अलाहाबाद विद्यापीठात त्यांनी रसायनशास्त्र, राज्यशास्त्र आणि प्रशासन या विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. शिवाय त्यांनी परदेशातही शिक्षण घेतलंय. लोक प्रशासन (Public Administration) विषयात त्यांनी जॉन एफ कॅनडी स्कूल ऑफ गवर्नमेंट, हार्वर्ड विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर 1967 मध्ये उत्तर प्रदेश केडरमधून आयएएस अधिकारी झाले.

अमित शाहांचे खाजगी सचिव

आयएएस साकेत कुमार गृहमंत्री अमित शाह यांचे खाजगी सचिव (Private Secretary to Amit Shah) आहेत. 2023 पर्यंत त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. ते 2009 च्या बॅचचे बिहार केडरचे अधिकारी आहेत. साकेत यांनी मधुबनीमधील डॉन बॉस्को स्कूल आणि दिल्लीतील मॉडल स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं. तर हिंदू कॉलेजमधून ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. यूपीएससीच्या दुसऱ्या प्रयत्नातच ते आयएएस झाले. देशात त्यांनी 13 वी रँक मिळवली होती.

स्मृती इराणींचे खाजगी सचिव

महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या खाजगी सचिव (Private Secretary to Smriti Irani)  म्हणून एम इमकोंगला जमीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एम इमकोंगला जमीर हे 2002 च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वीही त्यांनी स्मृती इराणी मनुष्य बळ विकास मंत्री असताना त्यांच्यासाठी खाजगी सचिव म्हणून काम पाहिलं होतं.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.