Weather Update : 90 किमी वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्याचा थरार… विजांच्या कडकडाटासह कोसळधार, IMD कडून या राज्यांना पावसाचा अलर्ट

IMD Weather Update : भारतीय हवानान विभागाने आपल्या ताज्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, या आठवड्यात पुन्हा वादळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक राज्यांना पाऊल झोडपण्याची शक्यता आहे.

Weather Update : 90 किमी वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्याचा थरार... विजांच्या कडकडाटासह कोसळधार, IMD कडून या राज्यांना पावसाचा अलर्ट
Heavy rain and lightning update
Image Credit source: Google
| Updated on: Jun 01, 2026 | 8:50 PM

देशाच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाचा कहर पहायला मिळत आहे. भारतीय हवानान विभागाने आपल्या ताज्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, या आठवड्यात पुन्हा वादळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात ईशान्य भारत आणि दक्षिण भारताच्या काही भागात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने असेही सांगितले की उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतात ताशी 70 किमी वेगाने वारे वाहू शकतात. या काळात अनेक ठिकाणी गारपीटीचाही इशारा देण्यात आला आहे. देशाच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बंगाल, सिक्कीम ओडिशीमध्ये पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, IMD नुसार 1 जून ते 6 जून दरम्यान पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या देशावर एकाच वेळी अनेक हवामान प्रणाली सक्रिय आहेत, त्यामुळे देशभरातील हवामानात मोठा बदल दिसून येत आहे अशी माहितीही हवामान विभागाने दिली आहे.

उत्तर भारतात कसे असेल हवामान?

IMD ने सांगितले की सध्या उत्तर-पश्चिम उत्तर प्रदेश आणि आसपासच्या भागात 3.1 ते 7.6 किमी उंचीवर पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहे. यामुळे हिमालयीन राज्ये, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये मेघगर्जना, पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. याशिवाय पाकिस्तान आणि राजस्थानच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून त्यामुळे गरम आणि थंड वाऱ्यांचे मिश्रण वाढत आहे. यामुळे उत्तर आणि उत्तर-पश्चिम भारतात धुळीचे वादळ, जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीटीची शक्यता वाढली आहे.

90 किमी वेगाने वाहणार वारे

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व भारतातील दक्षिण गंगा मैदान, पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा भागावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये जोरदार वादळासह पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी 40 ते 70 किमी आणि काही ठिकाणी 90 किमी वेगाने वारे वाहू शकतात. जोरदार वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सहा सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय

हवामान विभागाने सांगितले की ईशान्य भारत आणि दक्षिण आसामच्या भागावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेत मध्य भारतात दक्षिण-पूर्व मध्य प्रदेशातही वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर पूर्व विदर्भापासून दक्षिण केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा पसरला आहे, त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Follow Us