Pakistan: इम्रान खान महिलांशी अश्लील बोलतोय ? कॉल झाला व्हायरल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

इम्रान खानचा महिलांशी अश्लील बोलत असल्याचा कॉल व्हायरल, पक्ष म्हणतंय हे तर...

Pakistan: इम्रान खान महिलांशी अश्लील बोलतोय ? कॉल झाला व्हायरल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Imran Khan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 21, 2022 | 4:12 PM

मुंबई : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) हे एका नव्या रेकॉर्डींगमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Video) एक पुरुष महिलेशी अश्लील बोलत असल्याचं रेकॉर्डींग पाकिस्तानमध्ये व्हायरल झालं आहे. परंतु विरोधकांनी मात्र हा व्हिडीओ इमरान खानचा असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की, इमरान खान यांच्या पार्टीने हा व्हिडीओ खोटा असल्याचे म्हटले आहे.

इमरान खानचं नाव विरोधकांनी घेतलं असल्यामुळे इमरान खान अधिक चर्चेत आला आहे. इमरानच्या कार्यकर्त्यांनी त्याला बदनाम करण्यासाठी हा कट रचला असल्याचा आरोप केला आहे. तसेच विरोध म्हणतात की, आम्ही तसा विचार सुद्धा करु शकत नाही.

संबंधित व्हायरल झालेला व्हिडीओ पाकिस्तानच्या एका पत्रकाराच्या हाती लागला. त्यानंतर त्याने युट्यूबच्या माध्यमातून लोकांच्यासमोर आणला. सध्या तो व्हिडीओ अधिक व्हायरल झाला असून तो व्हिडीओ इमरान खानचा नसल्याचा पार्टीचे कार्यकर्ते सांगत आहेत.

पाकिस्तानमध्ये मागच्या काही दिवसांपासून राजकीय परिस्थिती अधिक गरज असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे इमरान खानने त्यावर अद्याप कसल्याची प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.