प्रियकराकडून विवाहित महिलेला हवे होते मूल, त्यानंतर प्रियकर आणि त्याच्या पत्नीने घेतला धक्कादायक निर्णय….

अनैतिक संबंधाचा शेवट नेहमीच धक्कादायक होतो. असेच एक प्रकरण एका गावात घडले आहे. एका तरुणाचे एका विवाहित महिलेशी संबंध जुळले होते. परंतू या महिलेला मूल नसल्याने तिने त्याच्याकडे मूल हवे असा हट्ट केला होता. तो तिला आणि प्रियकराला दोघांना महागात पडला.

प्रियकराकडून विवाहित महिलेला हवे होते मूल, त्यानंतर प्रियकर आणि त्याच्या पत्नीने घेतला धक्कादायक निर्णय....
crime scene
| Updated on: Dec 13, 2025 | 9:15 PM

महिला अंगणवाडी कार्यकर्त्याकडे तो तरुण दूध घ्यायाला जायचा. त्यानंतर त्या विवाहित अंगणवाडी कार्यकर्तीशी त्याचे संबंध जुळले. या लग्न झालेल्या महिलेला नवऱ्यापासून मूल नसल्याने तिला तिच्या या प्रियकराकडून मुल हवे होते. परंतू त्यामुळे तिचा प्रियकर तणावाखाली आला. त्याने त्याच्या पत्नीला ही गोष्ट सांगितली. त्यानंतर दोघांनी खतरनाक योजना आखली.

उत्तर प्रदेशातील वाराणसी एक हैराण करणारा प्रकार घडला आहे. येथी लक्ष्मणपूरच्या शारदा विहार कॉलनीत एका अंगणवाडी महिला कार्यकर्त्याचे एका मोहित नावाच्या तरुणाशी अनैतिक संबंध जुळले होते. ही विवाहित महिला घरात दूध विकण्याचा व्यवसाय करायची. त्यामुळे मोहित तिच्याकडे रोज सकाळी दूध आणायला जायचा. त्यात मोहितची आणि तिची ओळख झाली आणि दोघांचे अनैतिक संबंध सुरु झाले. परंतू या महिलेला मूल नसल्याने तिने मोहितला मूल हवे असल्याचे सांगितले. त्यानंतर मोहित तणावाखाली आला. आणि त्याने एक धक्कादायक निर्णय घेतला.

आरोपी मोहित यादव आधी या महिलेच्या शेजारी भाड्याने रहायचा. त्यामुळे त्याची ओळख या विवाहित महिलेशी झाली. त्यानंतर त्यांच्या अनैतिक संबंध सुरु झाले. महिलेला मूल नसल्याने त्याने मोहितवर जबरदस्ती करायला सुरुवात केली, जर मुल देणार नसशील तर मी तुझी पोलिसात तक्रार करेने अशी धमकी तिने त्याला दिल्याने तो तणावाखाली आला होता.

दरम्यान या मोहितचे एका अंजली नावाच्या तरुणीशी लग्न झाले. त्यानंतर एकदा अंजली हिला विश्वासात घेऊन त्याने ही बाब सांगितली. त्यानंतर दोघांना या महिलेला ठार करण्याचा प्लान आखला. अंगणवाडी महिला कार्यकर्त्याची हत्या करण्यासाठी मोहित आणि त्याची पत्नी एक होम स्टेमध्ये जाऊन थांबले. ११ डिसेंबर रोजी सकाळी दोघे या महिलेच्या घराकडे निघाले. अंजली घर येण्याआधी थांबली. तर मोहित पाठच्या रस्त्याने अंगणवाडी कार्यकर्तीच्या घरी हळूच घुसला. त्यानंतर घरात त्याने दगड आणि स्ट्रीलच्या टाकीने महिलेच्या डोक्यावर चेहऱ्यावर आणि मानेवर वार केले. आणि तिची निर्घृणपणे हत्या केली अशी माहिती एडीसीपी वरुणा झोन नीतू कात्यान यांनी दिली.

कशी झाली अटक

या विवाहित महिलेची हत्या केल्यानंतर या महिलेचे दागिने आणि कपाटातील रोकड घेऊन मोहित आणि अंजली बाहेर आले. रक्ताने माखलेल्या कपड्यांना शॉलने झाकून त्यांनी ऑटो पकडली. आणि पुन्हा ते होम स्टेला पोहचले. मोहित आणि त्याची पत्नी १२ डिसेंबरला पळून जाण्याच्या बेतात असताना शिवपुर रेल्वे स्थानकावर असताना पोलिसांनी त्यांना अटक केली.