
अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा सहावा दिवस आहे. आतापर्यंत या युद्धामध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. बुधवारी भारतामधून इराणकडे निघालेलेल्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये इराणची ही युद्धनौका बुडाली असून, या घटनेत सुमारे 87 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या घटनेला 24 तास होत नाहीत तोच इराणने आपला बदला घेतला आहे, इराणने अमेरिकेच्या जहाजावर भीषण हल्ला करून हे जहाज जाळलं आहे.
दरम्यान या युद्धाच्या दुसर्याच दिवशी अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. भारताकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती, अखेर आता भारतानं खामेनेई यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. भारत सरकारच्या वतीनं भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिल्ली स्थित इराणच्या दुतावासामध्ये जाऊन कंडोलेंस रजिस्टरवर स्वाक्षरी केली. तसेच या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
अयातुल्ला अली खामेनेई हे इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते होते. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी इस्त्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमध्ये त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर संपूर्ण इराणमध्ये संतापाची लाट पसरली, इराण अधिक आक्रमक झालं. दरम्यान या हल्ल्यामध्ये अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आणखी चार सदस्यांचा मृत्यू झाला. त्यामध्ये त्यांची सून, मुलगी, जावई आणि नात यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत 40 कमांडरचा देखील मृत्यू झाला होता. दरम्यान त्यानंतर आता भारतानं अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
प्रचंड नुकसान
या युद्धात आतापर्यंत प्रचंड नुकसान झालं आहे. इराणने देखील इस्त्रायल आणि अमेरिकेवर अनेक मोठे हल्ले केले आहेत. या हल्ल्यामध्ये दोन्ही देशांचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराणचं देखील मोठं नुकसान झालं आहे.