
इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलने रविवारी केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. खामेनेई यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील चार जण देखील या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत. अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराण शरण येईल, इराणचे सैन्य शस्त्र खाली ठेवतील असा अमेरिका आणि इस्रायलचा अंदाज होता. मात्र सध्या उलट घडताना दिसत आहे. अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणने अमेरिका आणि इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अमेरिकेचे ज्या -ज्या देशांमध्ये सैन्य तळ आहेत, त्या -त्या देशांवर इराणकडून मिसाईल हल्ले करण्यात आले आहेत. एवढंच नाही तर इराणकडून इस्रायलच्या राजधानीवर देखील हल्ला करण्यात आला आहे.
दरम्यान आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे इराणने थेट अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका युएएसएस अब्राहम लिंकनवर हल्ला केला आहे. याबाबत इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड्सकडून माहिती मिळाली आहे. आम्ही आमचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका युएएसएस अब्राहम लिंकनवर हल्ला केला असं त्यांनी म्हटलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार इराणने अमेरिकेच्या या युद्धनौकेवर चार मिसाईल डागल्या आहेत. मात्र अमेरिकेकडून अद्यापपर्यंत तरी अशा कोणत्याही हल्ल्याला दुजोरा देण्यात आलेला नाहीये. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणच्या सौनिकांना आणि तेथील पोलिसांना शरण येण्याचं आव्हान केलं आहे.
इराणने नेमकं काय म्हटलं?
इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड्सकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. आम्ही अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौका युएएसएस अब्राहम लिंकनवर हल्ला केला आहे. आम्ही चार बॅलिस्टिक मिसाईल डागले आहेत, असं इराणकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अमेरिकेकडून या दोन एयरक्राफ्ट कॅरिअर युद्धनौका मध्यपूर्वेमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत, त्यावर आता हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे, दरम्यान अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणने त्यांच्या मृत्यूचा बदल घेण्याची शपथ घेतली आहे.