इस्त्रायलकडून मोठी चूक, इराणचा तडकाफडकी सर्वात मोठा निर्णय, जगाची झोप उडाली, मध्यपूर्वेतून अत्यंत वाईट बातमी

मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराणमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला सुरुवात होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने घेतलेल्या एका निर्णयामुळे जगाची झोप उडाली आहे.

इस्त्रायलकडून मोठी चूक, इराणचा तडकाफडकी सर्वात मोठा निर्णय, जगाची झोप उडाली, मध्यपूर्वेतून अत्यंत वाईट बातमी
mojtaba khamenei
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 01, 2026 | 9:50 PM

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये या वर्षी 28 फेब्रुवारीला युद्धाला सुरुवात झाली होती. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली, त्यानंतर तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं. दरम्यान त्यानंतर पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराणकडून तात्पुरत्या स्वरुपात युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम वाढला असल्याची घोषणा केली होती. दरम्यान जरी सध्या दोन्ही देशांमध्ये युद्धविराम असला तरी देखील संघर्ष अजूनही कमी झालेला नाही. काही तासांपूर्वीच अमेरिकेकडून मोठा दावा करण्यात आला आहे. इराणच्या रडार ड्रोन साईट्सवर हल्ला करण्यात आल्याचं अमेरिकेनं म्हटलं होतं, तर इराणने अमेरिकेचा हा दावा फेटाळून लावला होता.

दरम्यान त्यानंतर आता मध्यपूर्वेतून अशी एक बातमी समोर आली आहे, की ज्यामुळे पुन्हा एकदा कोणत्याही क्षणी अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात होऊ शकते, दोन्ही देश युद्धविराम तोडू शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेसोबत सुरू असलेली चर्चा आता इराणने थांबवली आहे. इराणची वृत्तसंस्था असलेल्या तसनीमने या संदर्भात वृत्त दिलं आहे. या वृत्तसंस्थेनं दिलेल्या रिपोर्टनुसार इराणकडून अमेरिकेला मध्यस्थांच्या मदतीने प्रस्ताव पाठवण्यात येत होते, मात्र आता इराणकडून हे प्रस्ताव पाठवणं बंद करण्यात आलं आहे. तसेच अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नसल्याचंही इराणने स्पष्ट केलं आहे.

लेबनॉनवर इस्त्रायलकडून सुरू असलेले हल्ले तातडीने थाबवावेत ही अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील युद्धविरामाची मुख्य अट होती. परंतु इस्त्रायलकडून लेबनॉनवर वारंवार हल्ले सुरूच आहेत. अनेकदा इस्त्रायलने या अटीचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे आता इराणने आक्रमक भूमिका घेतली आहे. आता इराणने अमेरिकेसोबतची सर्व प्रकारची चर्चा थांबवली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूजवर देखील अजूनही तणाव कायम आहे. इस्त्रायची ही चूक आता जगाला महागात पडण्याची शक्यता आहे.

Follow Us