Iran Israel War : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी बोलावली सुरक्षा समितीची बैठक, घडामोडींना वेग

मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये इस्रायल, इराण युद्धावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Iran Israel War : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी बोलावली सुरक्षा समितीची बैठक, घडामोडींना वेग
pm modi
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 01, 2026 | 8:09 PM

अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, शनिवारी इस्रायलने अचानक इराणवर हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली. इस्रायलच्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं देखील इराणवर हल्ला केला. अमेरिकेनं काही दिवस आधीच या हल्ल्याची तयारी केली होती. अमेरिकेनं आपल्या दोन सर्वात शक्तीशाली युद्ध नौका आधीच मध्यपूर्वेत तैनात केल्या होत्या, तसेच सैन्यबळ देखील वाढवण्यात आलं होतं. अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर शनिवारी इस्रायलने इराणवर हल्ला केला, त्यानंतर लगेचच अमेरिकेनं देखील या युद्धात उडी घतेली. या युद्धात आतापर्यंत इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत, तसेच सैन्यासोबतच काही सामान्य नागरिकांचा देखील या युद्धात मृत्यू झाला आहे.

दरम्यान त्यानंतर रविवारी इस्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींनी देखील जीव गमावला आहे. दरम्यान अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. इराणने त्यांच्या नव्या सर्वोच्च नेत्याची नियुक्ती केली असून, प्रत्युत्तर म्हणून इस्रायलसह ज्या -ज्या देशांमध्ये अमेरिकेची सौन्य तळे आहेत, त्या देशावर इराणने जोरदार हल्ले केले आहेत.

इराण आणि इस्रायल, अमेरिकामध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा फटका जगभरातील जवळपास सर्वच देशांना बसण्याची शक्यता आहे. युद्ध सुरू झाल्यामुळे विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत, अनेक भारतीय नागरिक इराण आणि दुबईमध्ये अडकून पडले आहेत. आता या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे. इस्रायल -इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे. रात्री 9.30 वाजता ही बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये काय निर्णय घेतले जाणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us