जम्मू-काश्मीरमध्ये मोठी चकमक, 5 जवान शहीद, बिळात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरु

शोध मोहिम सुरु असताना अतिरेक्यांनी भारतीय सैन्याच्या जवानांवर हल्ला केला. त्यानंतर दोन्ही बाजूने गोळीबार सुरु झाला. या गोळीबारानंतर भारतीय सैन्याकडून परिसरात लपलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी शोध मोहिम राबवली जात आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये मोठी चकमक, 5 जवान शहीद, बिळात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरु
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 5:03 PM

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना काही केल्या लगाम बसताना दिसत नाहीय. दहशतवाद्यांनी भर पावसात भारतीय सैन्याच्या एका वाहनावर ग्रेनेड हल्ला केल्याची घटना गेल्या आठवड्यात समोर आलेली. त्यानंतर आजही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे भारतीय सैन्याचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत भारतीय सैन्याचे 5 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आल्याची देखील माहिती समोर आली आहे. सध्या संबंधित परिसरात भारतीय सैन्याकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.

मिळालेल्या माहितनुसार, परिसरात वातावरण खराब आहे. तिथे अधूनमधून पाऊस देखील पडतोय. या दरम्यान अतिरेकी आणि भारतीय जवान यांच्यात चकमक झाली. शोध मोहिम सुरु असताना अतिरेक्यांनी भारतीय सैन्याच्या जवानांवर हल्ला केला. त्यानंतर दोन्ही बाजूने गोळीबार सुरु झाला. या गोळीबारानंतर भारतीय सैन्याकडून परिसरात लपलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी शोध मोहिम राबवली जात आहे.

या गोळीबारात दोन जण जागेवरच शहीद झाले. तर चार जवान गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्यात आलं. पण उचारादरम्यान तीन जवानांचं निधन झालं. या ऑपरेशन दरम्यान भारतीय सैन्याचे पाच जवान शहीद झाले आहेत. या घटनेवर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अतिरेक्यांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या कारवायांना कायमस्वरुपी लगाम लागायला हवा, अशी भावना देशाची आहे. भारतीय सैन्यदल त्यासाठी नेहमी मेहनत घेत आहे. पण तरीही दहशतवाद संपायचं नाव दिसत नाहीय.

हे सुद्धा वाचा

राजौरीमध्ये इंटरनेट सेवा बंद

खरंतर राजौरीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरु होतं. राजौरी सेक्टरमधील कंडी जंगल येथे अतिरेकी लपून बसल्याची माहिती भारतीय सैन्याला मिळाली होती. संबंधित माहिती मिळाल्यानंतर 3 मे पासून एक संयुक्त अभियान राबवण्यात येत होतं. या दरम्यान भारतीय सैन्याला आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका गुहेत अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाली. भारतीय सैन्याने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी बॉम्बफेक करत हल्ला केला.

या सगळ्या गदारोळानंतर आजूबाजूच्या परिसरात तैनात असलेल्या सैन्याच्या पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आलं. तर जखमी जवानांना हेलिकॉप्टरने उधमपूर कमांड हॉस्पिटलला पोहोचवण्यात आलं. राजौरीत अजूनहीनही शोध मोहिम सुरु आहे. तसेच परिसरात इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे. तर भारतीय सैन्याकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.