इस्रायलला युद्धसामुग्री पाठवून कारगिलचे जुने कर्ज फेडत होता भारत, स्पेनने दिला असा झटका की…

अमेरिकेने इस्रायल आणि हमास दरम्यान सुरु असलेल्या संघर्षात इस्रायलला युद्धसामुग्री आणि दारूगोळा पुरविण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे कारगिल युद्धात केलेल्या मदतीचे भान राखून भारतातने इस्रायलला मदत म्हणून एक 27 टन दारुगोळा लादलेले जहाज पाठविले होते. परंतू स्पेनने भारतला मोठा झटका दिला आहे.

इस्रायलला युद्धसामुग्री पाठवून कारगिलचे जुने कर्ज फेडत होता भारत, स्पेनने दिला असा झटका की...
Spain gave shock to indiaImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: May 18, 2024 | 10:28 PM

इस्रायल आणि हमासचे युद्ध सुरु होऊन सात महिने होत आले आहेत. या युद्धावरुन जगाचे दोन भाग झाले आहेत. एक इस्रायलच्या बाजूचे तर दुसरे पॅलॅस्टाईनच्या बाजूचे. इस्रायलच्या मदतीसाठी भारताने दारुगोळा भरुन मोठे जहाज रवाना केले होते. कारण कारगिल युद्धाच्या वेळी इस्रायलने भारताला मदत केली होती. या जहाजात जवळपास 27 टन दारुगोळा होता. या जहाजाला स्पेनने अडवले आहे. मॅरियाने डेनिका नावाच्या या जहाजाला रोखण्यात आले आहे. प्रथमच आमच्या देशाने असे  पाऊल उचलेले असल्याचे स्पेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जोस मॅन्यअर अल्वेयर्स यांनी म्हटले आहे.

इस्रायलवर हमासच्या अतिरेक्यांनी गेल्यावर्षी 7 ऑक्टोबर रोजी पॅराग्लायडरच्या मदतीने अमानुष हल्ला करीत जवळपास 2,500 लोकांची हत्या केली. याचा बदला इस्रायलने घ्यायला सुरुवात केली त्यास आता जवळपास आत सात महिने होत आले आहे. इस्रायलने गाझापट्टीची अक्षरश: राखरांगोळी करुन टाकली आहे. यावरुन जगभरात इस्रायलवर टीकेची झोड उठली आहे. इस्रायलचा पाठीराखा असलेल्या अमेरिकेने देखील इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याऊ यांच्यावर टीका केली आहे. इस्रायलच्या मदतीसाठी भारताने चेन्नईहून हायफासाठी जहाज पाठविले. यात 26.8 टने दारूगोळा आहे. भारतीय कंपनी सिद्धार्थ लॉजिस्टीकने या दारुगोळ्याला इस्रायल कार्गो लॉजिस्टीकसाठी पाठविले होते. परंतू स्पेन प्रथमच इस्रायलच्या चाललेल्या दारुगोळ्याच्या जहाजाला अडविले आहे. आमच्या एका जहाजाला स्पेनच्या बंदरात थांबण्यासाठी नकार मिळाला असल्याचे आम्हाला समजले आहे असे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैसवाल यांनी म्हटले आहे. या प्रकरणाला आम्ही गांभीर्याने घेतले आहे. परंतू या बाबत अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.

इस्रायलची कारगिल युद्धातली मदत

इस्रायल मोठ्या प्रमाणावर भारतातकडून शस्रास्रे खरेदी करतो. अमेरिकेने हात आखडता घेतल्याने इस्रायलला मोठा फटका बसला आहे, आणि इस्रायलला युद्धासाठी शस्रास्राची गरज आहे. भारतात इस्रायलच्या कंपन्या शस्रनिर्मितीत आघाडीवर आहेत. कारगिल युद्धात जेव्हा भारताला मोठ्या प्रमाणावर शस्रास्रांची गरज होती. तेव्हा भारताचा मित्र असलेल्या इस्रायलने मोठी मदत पाठविली होती. इस्रायलने भारताला लेझर गायडेट बॉम्ब पाठवले होते. इस्रायलचे जुने कर्ज भारतावर असल्याने भारताने इस्रायलची मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारताने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नसल्याचे म्हटले जात आहे. ज्यावेळी पाकिस्तानच्या दहशतवादी अजमल कसाब आणि साथीदारांनी मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी हल्ला केला. त्यावेळी इस्रायलने पाकच्या अतिरेकी अडड्यांवर हल्ला करण्यासाठी भारताकडे धावपट्टीचा वापर करण्याची परवानगी मागितली होती.

स्पेनचे म्हणणे काय ?

भारताच्या या जहाजाला आपल्या बंदरात थांब्याची परवानगी नाकारल्यानंतर स्पेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी निवदेन जारी केले आहे. त्यात त्यांनी मध्यपूर्वेला शांततेची गरज असून शस्रास्रांची गरज नसल्याचे म्हटले आहे. या समुद्री मार्गाने शस्त्रास्त्रांची रसद घेऊन जाणारे जहाज इस्रायलला जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे स्पेनने म्हटले आहे. 21 मे रोजी जहाजाने बंदरावर थांबण्याची परवानगी मागितली होती. वास्तविक, लांबचा प्रवास असल्याने जहाजाला मध्यभागी थांबवून आवश्यक ती देखभाल आणि इतर दुरुस्ती करण्याची आवश्यकता होती. इस्रायलसाठी दारूगोळा घेऊन जाणारी कोणत्याही देशांची जहाजे बंदरावर थांबू दिली जाणार नाहीत, असे स्पेनचे जुने धोरण असल्याचे स्पेनने म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.