जम्मू-काश्मिरात सुरक्षा दलास मोठे यश, लश्करच्या दोन दहशतवाद्यांकडून आत्मसमर्पण

जम्मू-काश्मीरमधील शोफियामध्ये दोन दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण करत शस्त्र खाली ठेवली आहेत. या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच रोख रक्कम आणि मोबाईलही जप्त केला आहे. गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली आहे.

जम्मू-काश्मिरात सुरक्षा दलास मोठे यश, लश्करच्या दोन दहशतवाद्यांकडून आत्मसमर्पण
शोपियामध्ये लष्करच्या दोन दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले
| Updated on: May 29, 2025 | 10:38 AM

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दल सतर्क झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये असणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. या दरम्यान, सुरक्षा दलास मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीरमधील शोपियामध्ये लष्करच्या दोन दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. इरफान बशीर आणि उजैर सलाम असे त्यांचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून सुरक्षा दलाने बसकुचन भागांत शोध मोहीम चालवली होती.

शोफियामध्ये दोन दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण करत शस्त्र खाली ठेवली आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. त्यात दोन एके-56 रायफल, 4 मॅगझीन, 102 राउंड (7.62×39 मिमी), 2 हँड ग्रेनेड, 2 पाउच यांचा समावेश आहे. दोन्ही दहशतवाद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तपास सुरु केला आहे.

दहशतवाद्यांना घेरले अन्…

ऑपरेशनची माहिती देताना सुरक्षा दलाने सांगितले की, बुधवारी रात्री बसकुचन भागात शोध मोहीम सुरु करण्यात आली. सुरक्षा दलांना मिळालेल्या माहितीनंतर या भागात दहशतवाद्यांचा शोध सुरु करण्यात आला. परिसराची नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी एका उद्यानामध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षादलाने त्या परिसरात घेराबंदी केली. दहशतवाद्यांना घेरले गेल्याचे लक्षात येताच लश्कर-ए-तैयबाच्या दोन हायब्रिड दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांच्याकडून शस्त्रसाठाबरोबर 5,400 रुपये रोख, एक मोबाइल फोन, एक स्मार्टवॉच आणि एका आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे.

सोपोरात दहशतवाद्यास अटक

जम्मू-कश्मीर पोलिसांनी नार्को-टेरर मॉड्यूलमध्ये सहभागी एका दहशतवाद्यास अटक केली आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे अब्दुल राशिद मीर याला अटक करण्यात आली. मागील दोन वर्षांपासून तो फरार होता. त्याचा शोध सुरु होता.

भारताने पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवले. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्या हल्ल्यात शंभरपेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले. त्यात काही मोस्ट वॉटेंड दहशतवादही आहेत. मसूद अझहर याच्या परिवारातील दहा जणांचा खात्मा करण्यात आला.