ST Bus Attack : कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला, चालकाला काळं फासून मारहाण

ST Bus Attack : कर्नाटकात चित्रदुर्ग इथे महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला झाला आहे. एसटी बसला काळं फासण्यात आलं आहे. त्याशिवाय ड्रायव्हरला मारहाण झाली आहे. हे कोणी केलं? यामागे काय उद्देश आहे? जाणून घ्या.

ST Bus Attack : कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला, चालकाला काळं फासून मारहाण
ST Bus Ataack
| Updated on: Feb 22, 2025 | 8:07 AM

मागच्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात सीमावादाचा प्रश्न आहे. बेळगाववरुन दोन्ही राज्यात हिंसक आंदोलन झाली आहेत. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमावादाच्या प्रश्नावरुन तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सीमा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. कर्नाटक येथे एसटी महामंडळाच्या एसटी बसला कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काळ फासलं.

कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्याची देखील माहिती आहे. एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येते का ? अशी विचारणा केली. एसटी महामंडळाच्या बसला काळं फासलं. पुणे-बंगळुरु महामार्गावर चित्रदुर्ग इथे ही घटना घडली आहे. सध्या कर्नाटकचा भाग असलेल्या बेळगावातील मराठी भाषिकांनी महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी मागच्या अनेक वर्षात बरीच आंदोलनं केली. पण कर्नाटकातील सत्ताधाऱ्यांनी राजकीय ताकदीच्या बळावर ही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला.

कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवण्याची ही पहिली वेळ नाही

महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांनी खासकरुन शिवसेनेने बेळगावचा मुद्दा लावून धरला. कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी सुद्धा त्यांनी अनेकदा महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले केले आहेत. 2022 साली डिसेंबर महिन्यात बेळगावच्या हिरेबागेवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर जोरदार हल्ला केला होता. दगडफेक करुन बस, ट्रकच्या काचा फोडल्या होत्या. नंबर प्लेटची तोडफोड केलेली. बस आणि ट्रकच्या छतावर चढून कन्नड रक्षण वेदिकेचा झेंडा फडकवलेला.