VIDEO : व्हायरल व्हिडीओमुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री अडचणीत

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि तोच व्हिडीओ कुमारस्वामींसाठी सध्या डोकेदुखी ठरला आहे. या व्हिडीओमध्ये कुमारस्वामी फोनवर एका व्यक्तीसोबत बोलताना दिसत आहेत. त्यात ते फोनवरुन त्या व्यक्तीला मारुन टाकण्याचे आदेश देत आहे. याच दरम्यान एका पत्रकाराने हा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेरात कैद …

, VIDEO : व्हायरल व्हिडीओमुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री अडचणीत

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि तोच व्हिडीओ कुमारस्वामींसाठी सध्या डोकेदुखी ठरला आहे. या व्हिडीओमध्ये कुमारस्वामी फोनवर एका व्यक्तीसोबत बोलताना दिसत आहेत. त्यात ते फोनवरुन त्या व्यक्तीला मारुन टाकण्याचे आदेश देत आहे. याच दरम्यान एका पत्रकाराने हा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला आहे. जनता दल सेक्युलरच्या स्थानिक नेत्याची हत्या झाल्यानंतर कुमारस्वामी पोलीस अधिकाऱ्यांना आदेश देत होते असं बोललं जात आहे.


हा व्हिडीओ स्थानिक पत्रकाराने रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओमध्ये कुमारस्वामी बोलताना दिसत आहेत.

“प्रकाश एक चांगला व्यक्ती होता. मला नाही माहित त्याला कोणी मारले. पण आरोपींना मारुन टाका, काही वाद नाही होणार”, असं मुख्यमंत्री फोनवर बोलताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्याच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री या हत्येमुळे चिंताग्रस्त होते आणि ते भावनेच्या भरात हे बोलून गेले.

मी ते सर्व रागात बोलून गेलो होतो. मुख्यमंत्री म्हणून मी काही आदेश दिलेले नाहीत. आरोपींची इतर दोन खुनाच्या प्रकरणात चौकशी सुरु आहे. ते जेलमध्ये आहेत आणि त्यांनी अजून एकाचा खून केला आहे, असं मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी व्हायरल व्हिडीओनंतर सांगितले.

नुकतेच जनता दल सेक्युलरचा नेता प्रकाश यांची सोमवारी संध्याकाळी 4.30 वाजता दक्षीण कर्नाटकमधील मंड्या इथे हत्या झाली होती. बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञांत व्यक्तींनी हा हल्ला केल्याचे सांगितेल जात आहे. प्रकाश यांची गाडी थांबवून कुऱ्हाडीने त्यांचा खून केला. या घटनेच्या तपासादरम्यानच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आरोपीला थेट मारुन टाकण्याबाबत वक्तव्य केलं. त्याचाच व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *