Shocking : भीषण अपघात! भरधाव कार ट्रकला धडकली; एकाच वेळी 8 भावी इंजिनीअरचा जागीच मृत्यू
केरळमध्ये भरधाव कार ट्रकला धडकल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाच वेळी 8 भावी इंजिनीअरचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाल्याचे दिसून आले.

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात तामिळनाडूमधील 8 इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर कारचा चक्काचूर झाला. या विद्यार्थ्यांचे मृतदेह कारमध्ये अडकल्याचे पाहायला मिळत आहे. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भीषण अपघाताची घटना शुक्रवारी रात्री 11.40 वाजता काइपमंगलमजवळील राष्ट्रीय महामार्गावर ही घडली. सर्व विद्यार्थी गुरवायूर येथून कोडुंगल्लूरच्या दिशेने जात होते. प्राथमिक माहितीनुसार, अपघात स्थळी रस्त्याच्या दुरूस्तीचं काम सुरू होतं. त्याच ठिकाणी हा भीषण अपघात झाला. रस्त्यावर ट्रक उभा होता. त्याचवेळी मागून आलेल्या भरधाव कारने धडक दिली. या भीषण अपघातात 7 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर एका विद्यार्थ्याने रुग्णालयात घेऊन वाटेतच जीव सोडला.
अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी एकच आक्रोश केला. स्थानिकांनी तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. दोघांचे मृतदेह कारखाली अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांना सर्वांचे मृतदेह कारमधून बाहेर काढताना अथक प्रयत्न करावे लागले. या कारची नोंदणी तामिळनाडूची आहे. सर्व विद्यार्थी हे पीएसएनए इंजिनीअरिंग कॉलेजचे आहेत.
भीषण अपघातात भावी इंजिनीअरचा जागीच मृत्यू
सर्व मृत विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे. विश्व (20), सूर्या (20), संतोष (20), प्रसन्ना, युवसंजीत (20) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी सर्व आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन त्रिशूर मेडिकल कॉलेजच्या शवगृहात पाठवले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. अपघात (Accident) नेमका कसा झाला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. विद्यार्थ्यांची गुरुवायूरहून कोडुंगल्लूरच्या दिशेने जात होती. रस्त्यावर तीन ट्रक उभे होती. त्यातील एका ट्रकला भरधाव कारने धडक दिली. स्थानिकांनी आरोप केला की, हे ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. वरिष्ठ पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पोलिसांकडून आजूबाजूच्या सीसीटीव्हीची तपासणी केली जात आहे.