AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! 4 भाविकांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

Nanded Accident News : नांदेडच्या किनवट तालुक्यातील तोटंबा घाटात झालेल्या या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! 4  भाविकांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी
Nanded Accident NewsImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 31, 2026 | 10:50 PM
Share

नांदेडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सहस्रकुंड धबधबा येथे महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या कमांडर जीपला भीषण अपघात झाला. किनवट तालुक्यातील तोटंबा घाटात झालेल्या या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील कुबीर मंडळातील पारडी येथील रहिवासी असलेले काही प्रवासी सहस्रकुंड धबधबा येथे महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून ते कमांडर जीपने तेलंगणाकडे परतत असताना तोटंबा घाटात हा भीषण अपघात घडला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळल्याची प्राथमिक माहिती आहे. धडक इतकी भीषण होती की, या दुर्घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींवर उपचार सुरू

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जीपमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्यातील कुबीर येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, अपघातग्रस्त कमांडर जीप ही सहस्रकुंड ते तेलंगणा दरम्यान नियमित प्रवासी वाहतूक करणारी असल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातामुळे सहस्रकुंड परिसरात शोककळा पसरली असून, अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे.

मालाडमध्ये भरधाव वाहनाचा थरार,3 रिक्षांसह दुचाकीला धडक, महिलेचा मृत्यू

मुंबईच्या मालाडमध्ये भरधाव वाहनाने रिक्षा आणि दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना काल रात्री मालाड येथील एस. व्ही. रोड आणि मामलेदार वाडी रोडच्या जंक्शनवर घडली. या प्रकरणी पोलिसांनी 70 वर्षीय चालकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा शांताराम चमनकर हे एमजी विंसर वाहनाने भरधाव वेगात जात असताना तीन रिक्षा आणि एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात मोटरसायकल चालकासह एकूण सहा जण जखमी झाले. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या भीषण अपघातात प्रियांका शाह या महिलेचा मृत्यू झाला आहे. प्रियांका शाह या व्यवसायाने वकील असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांच्या उपस्थितीत तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप