AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेंबूर वाशीनाका परिसरात ट्रकमधून वायूगळती झाल्याने घबराट, दोन किमीची वाहतूक बंद

चेंबूर वाशीनाका जिजामाता नगरात धोकादायक केमिकलची गळती झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असल्याने खबरदारी म्हणून दोन्ही दिशेची वाहतूक थांबवण्यात आली आहे.

चेंबूर वाशीनाका परिसरात ट्रकमधून वायूगळती झाल्याने घबराट, दोन किमीची वाहतूक बंद
file photos
| Updated on: Aug 31, 2026 | 10:40 PM
Share

मुंबईतील चेंबूर वाशीनाका परिसरात एका केमिकल ट्रकमधून धोकादायक केमिकलची गळती झाल्याची घटना घडली आहे.यामुळे नागरिकांना श्वसनास त्रास होत असल्याने येथील दोन्ही दिशेची वाहतूक दोन किमीपर्यंत बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी फायरब्रिगेटच्या चार वाहनांनी ताबा घेतला असून केमिकल लिकेज दूर करणारे पथक देखील पोहचले आहे.

केमिकल वाहून नेणाऱ्या एका ट्रकमधून अचानक गळती सुरु झाल्याने संपूर्ण परिसरात घबराट पसरल्याची घटना चेंबूर वाशीनाका जिजामाता परिसरात घडली आहे.या ट्रकमधून बेनझेन केमिकल लीकेज झाल्याने परिसरातील नागरिकांना हलवण्यात आले आहे. तसेच महामार्गावरील दोन्ही दिशेची दोन किलोमीटरची वाहतूक पोलिसांनी खबरदारी म्हणून बंद केली आहे.

चेंबूर वाशीनाका परिसरातीस या ट्रकमधून धोकादायक वायूची गळती झाल्याने या परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरूझाला. त्यामुळे तातडीने फायर ब्रिगेडला पाचरण करण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. ट्रकमधील केमिकल गळती रोखण्यासाठी हे पथक प्रयत्न करत आहे. या ठिकाणी वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून दोन किमी थांबवण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

परिस्थिती नियंत्रणात

केमिकलची गळती झालेला हा टँकर 22000 टनाचा असून त्याच्या बॉटम बॉलमध्ये केमिकल लिकेज झाल्याचे म्हटले जात आहे. घटनास्थळी फायर ब्रिगेड आणि पोलिस यंत्रणा देखील दाखल झाली आहे. अग्निशमन दलाद्वारे लिकेज बंद करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. बेनझीन नावाचे केमिकल लिकेज झाल्याचे वॉर्ड ऑफीसर शंकर भोसले यांनी सांगितले. या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.

Follow Us
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...