AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delimitation Bill: फक्त 54 मतांनी डिलिमिटेशन विधेयक पडलेलं, आता मोदी शाहांनी लावली परफेक्ट फिल्डिंग, सात महिन्यांत सगळा गेम बदलला…

Modi -Shah on Delimitation Bill : अवघ्या सात महिन्यापूर्वी बारगळलेली दोन विधायके मोदी सरकार पुन्हा एकदा मंजूरीसाठी संसदेसमोर आणणार आहे. उद्यापासून दोन्ही विधेयकावर चर्चा होऊन मत चाचणी होईल. त्यासाठी सरकारने कशी लावली फिल्डिंग?

Delimitation Bill: फक्त 54 मतांनी डिलिमिटेशन विधेयक पडलेलं, आता मोदी शाहांनी लावली परफेक्ट फिल्डिंग, सात महिन्यांत सगळा गेम बदलला...
मोदी शाहांनी लावली परफेक्ट फिल्डिंग, सगळा गेम बदलला...
| Updated on: Nov 29, 2026 | 11:49 AM
Share

Modi -Shah on Delimitation Bill : मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकावरून मोठी खलबतं आणि घाडमोडी सुरू आहे. मित्र शत्रू ठरतायेत, तर शत्रू मित्र होत आहेत. राजकीय पक्षांच्या बदलत्या भूमिकेवरून टीकास्त्र डागण्यात येत आहे. 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत अवघ्या 54 मतांनी ही दोन्ही विधेयकं बारगळली होती. पण सात महिन्यांत राजकीय समीकरणं वेगानं बदलली. संवाद, संपर्क आणि रणनीती या त्रिसूत्रीवर सरकारने भर दिला. या माध्यमातून विधेयकांसाठी सरकारने दोन-तृतीयांशपेक्षाही अधिक खासदारांचा पाठिंबा जुळवल्याचे म्हटले जात आहे. द्रमुक, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, बीआरएस आणि वायएसआरसीपी पक्षांनी विधेयकाच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका स्पष्ट केल्याने इंडिया आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत.

सात महिन्यात अशी बदलली रणनीती

एप्रिलमध्ये विधेयक बारगळल्यानंतर सरकारची मोठी नाचक्की झाली होती. विरोधकांची एकजूट हा चर्चेचा विषय ठरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मग मोठी खेळी खेळली. त्यांनी या विधेयकासाठी जोर लावला. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर द्रमुक आणि काँग्रेसमधील वाढलेले अंतर भाजपच्या पथ्यावर पडले. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीतील घाडमोडी, बीआरएसची काँग्रेसबाबतची भूमिका, शिरोमणी अकाली दल पुन्हा रालोआत आणण्याचे यशस्वी प्रयत्न आणि तृणमूल काँग्रेसला सुरूंग लावण्यात आलेले यश, यासारख्या अनेक घाडमोडींनी या विधयेकाचा मंजूरीच्या दृष्टीने मार्ग प्रशस्त केला. तामिळनाडूत खासदार कनिमोझी आणि ए. राजा यांच्या माध्यमातून थेट एम. के. स्टॅलिन यांच्याशी संवाद साधल्याचे आणि सुप्रिया सुळे-शरद पवार यांच्या सोबत त्यांच्या निकटवर्तीयांशी चर्चा झाल्याचेही समोर येत आहे.

उत्तर प्रदेशचे विभाजन तुर्तास रोखले

उत्तर प्रदेश राज्याचे विभाजन करण्याची चर्चा यापूर्वी सुरू झाली होती. पण आता तशी विभाजनाची गरज नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले. प्रस्तावित विधेयकातील मसुद्यात उत्तर प्रदेश विधानसभेतील 403 जागा 40 ने वाढवण्याचा प्रस्ताव आहे. मसुद्यात 605 जागा वाढवण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे या राज्याच्या विभाजनाची चर्चा रखडली आहे.

काँग्रेसची रणनीती अपयशी?

काँग्रेसला इंडिया आघाडीची मोट धरून ठेवण्यात सातत्याने अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. एसआयआर प्रकरणात अगोदर इंडिया आघाडीला घेऊन आंदोलन करण्यात आले आणि नंतर काँग्रेस एकटीच मैदानात उतरल्याचे चित्र समोर आले. अनेक मुद्यांवर काँग्रेस थेट संवाद साधण्यात तसेच समन्वय साधण्यातही पक्ष कमी पडत असल्याची घटक पक्षांची ओरड यापूर्वीही समोर येत आहे. त्याचा फायदा भाजपने घेतल्याचे दिसून येते.

Follow Us
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक...
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा!
शरद पवारांच्या NCP ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे...
शरद पवारांच्या NCP  ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे; काँग्रेस नेत्याचे पुन्हा आवाहन!
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक,
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक, सुनेत्रा पवारांचेही केले कौतुक!
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा...
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा अमित शाहांना सवाल
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात...
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात मतदानाचे आदेश
भिवंडीत प्रसिद्ध मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या खजुरात अळ्या...
भिवंडीत प्रसिद्ध मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या खजुरात अळ्या; ग्राहकांमध्ये संताप!
डिलिमिटेशन विधेयकाविरोधात काँग्रेसची मोठी तयारी! मल्लिकार्जुन खर्गें..
डिलिमिटेशन विधेयकाविरोधात काँग्रेसची मोठी तयारी! मल्लिकार्जुन खर्गें घेणार स्टॅलिन-पवारांची प्रत्यक्ष भेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA चा मोठा दणका! 12 हॉटेल्ससह ब्लिंकइट...
छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA चा मोठा दणका! 12 हॉटेल्ससह ब्लिंकइट स्टोअर्सचे परवाने निलंबित
डिलिमिटेशन विधेयकावरून दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; राजकीय पक्षांची
डिलिमिटेशन विधेयकावरून दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; राजकीय पक्षांची आज महत्त्वाची बैठक!