AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मिशन केरळ’साठी भाजपची मोठी खेळी; मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांना मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी

गेल्याच आठवड्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासूनच ई. श्रीधरन मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा रंगली होती. | Kerala CM E Sreedharan

'मिशन केरळ'साठी भाजपची मोठी खेळी; मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांना मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी
| Edited By: | Updated on: Mar 25, 2021 | 4:55 PM
Share

तिरुअनंतपुरम: केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Kerla assembly election 2021)  पार्श्वभूमीवर भाजपने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. केरळमध्ये भाजपची सत्ता आल्यास ई श्रीधरन हे मुख्यमंत्री असतील. 88 वर्षांच्या ई श्रीधरन (E Sreedharan ) हे देशभरात मेट्रोमॅन म्हणून ओळखले जातात. गेल्याच आठवड्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासूनच ई. श्रीधरन मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा रंगली होती. अखेर आज या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाले. (Metro Man E Sreedharan is BJP’s CM candidate in Kerla)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्या नेतृत्त्वाखाली सध्या केरळमध्ये ‘विजय यात्रे’च्या माध्यमातून प्रचार सुरु आहे. पक्षाकडून लवकरच उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती के. सुरेंद्रन यांनी दिली.

56 वर्षांची कारकीर्द

ई. श्रीधरन यांचं पूर्ण नाव इलाट्टुवलापील श्रीधरन आहे. सध्या त्यांचं वय 89 वर्षे असून त्यांना 58 वर्षांचा धोरण ठरवणे, शहर नियोजन याचा अनुभव आहेत. भारतील मेट्रो प्रकल्प यासाठी त्यांनी देशातील विविध शहरांमध्ये आणि परदेशातील प्रवास केला आहे. श्रीधरन यांना मेट्रो प्रकल्प, रेल्वे, रेल्वे उड्डाणपूल याबद्दल केलेल्या कामासाठी मेट्रोमॅन म्हटलं जाते.

विविध पुरस्कारांनी सन्मानित

ई.श्रीधरन यांना भारत सरकारनं त्यांच्या कामासाठी 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केले आहे. फ्रान्स सरकारनं देखील श्रीधरन यांना 2005 मध्ये पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तर जपानने देखील त्यांना 2013 मध्ये ऑर्डर ऑफ रायझिंग सन पुरस्कार दिला आहे.

2017 मध्ये राष्ट्रपतीपदासाठी नाव चर्चेत

मेट्रोमॅन ई.श्रीधरन यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाकडून माझा राष्ट्रपती पदासाठी विचार होणार नाही. राष्ट्रपती पदासाठी नाव चर्चेत या माध्यमांनी दिलेल्या बातम्या होत्या, असं म्हटलं होते. जरी राष्ट्रपतीपदासाठी विचार झाला तरी वयाचा विचार करुन नकार देईन, असंही ते म्हणाले होते.

दिल्ली मेट्रो ते कोचीमध्ये काम

ई.श्रीधरन 2019 मध्ये कोची मेट्रोचे प्रमुख म्हणून काम करत होते. कोची मेट्रोचा प्रकल्प 24 किलो मीटरचा आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या लखनऊ, कानपूर आणि मीरत मेट्रो प्रकल्पासाठी ते सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. मेट्रो प्रकल्प हा सार्वजनिक सेवेतील प्रकल्प असल्यानं त्याची किंमत लोकांना परवडणारी असावी, अशी भूमिका श्रीधरन यांनी घेतली होती.

ई.श्रीधरन यांच्या नेतृत्वात पाम्बन ब्रीजची पुनर्बांधणी करण्यात आली होती. त्यावेळी ते दक्षिण रेल्वेमध्ये कार्यरत होते. त्यावेळी त्यांचं वय 32 वर्ष होते. अवघ्या 46 दिवसामध्ये ते काम पूर्ण करण्यात आले होते. दिल्ली मेट्रोच्या निर्मितीमध्येही ई.श्रीधरन यांनी नेतृत्व केले होते. कोकण रेल्वेशी देखील ते संबंधित होते.

केरळच्या राजकारणाचा विचार करता तिथे सध्या डाव्या पक्षांच्या आघाडीची सत्ता आहे.तर, काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. भाजपनं गेल्या काही वर्षांपासून केरळमध्ये जोर लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांना यश आलं नव्हतं. मेट्रोमॅन ई.श्रीधरन यांच्या पक्षप्रवेशाचा भाजपला किती फायदा होणार हे पाहावं लागणार आहे.

(Metro Man E Sreedharan is BJP’s CM candidate in Kerla)

Follow Us
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.