LPG gas cylinder : एलपीजी गॅस सिलेंडरबाबत अत्यंत मोठी बातमी, अधिकाऱ्यांनी थेट सांगितले..

एलपीजी गॅसबाबत अत्यंत मोठी बातमी पुढे येत आहे. एलपीजी गॅस मिळत नसल्याची अफवा पसरवली जात आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी थेट स्पष्टीकरण दिले. ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना अत्यंत मोठा दिलासा मिळाल्याचे बघायला मिळतंय.

LPG gas cylinder : एलपीजी गॅस सिलेंडरबाबत अत्यंत मोठी बातमी, अधिकाऱ्यांनी थेट सांगितले..
LPG gas cylinder
| Updated on: May 29, 2026 | 8:40 AM

इराण आणि अमेरिका युद्धात जगाची चिंता वाढली आहे. एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला. पूर्ण पुरवठा साखळीच विस्कळीत झाली. 60 दिवसांपेक्षा जास्त काळापासून होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने जगावर ऊर्जेचे संकट आहे. महागाई वाढत आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला होता. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली. भू-राजकीय तणावामुळे जगभरातील ऊर्जा पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. एलपीजी गॅस, आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या वाढीव किमती आणि तुटवड्यामुळे लोक तणावात आहेत. अशातच सरकारने लोकांना मोठा दिलासा दिला. सरकारने स्पष्ट केले की, देशात घरगुती एलपीजी गॅसचा कोणत्याही प्रकारचा पुरवठा तुटवडा नाही. नेहमीप्रमाणेच सर्व वितरण व्यवस्थितपणे सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी एलपीजी गॅसकरिता लोकांनी मोठा रांगा लावल्या होत्या. अधिकाऱ्यांनी लोकांना घाबरून न जाण्याचा सल्ला दिला. यासोबतच गॅस मिळण्याबाबत ज्याकाही अफवा पसरवला जात आहेत, त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. गॅस सिलेंडरचे वितरण व्यवस्थित सुरू आहे. त्यात कोणताही अडथळा नसल्याचेही स्पष्ट केले.

भारतातील अनेक शहरांमध्ये घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये तफावत कायम आहे, कारण मार्चमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात केवळ ₹60 ची वाढ झाली होती. मात्र, इराण आणि अमेरिका युद्धादरम्यान जवळपास सर्व गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली. पण सरकारकडून कोणत्याही प्रकारची एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली नाही. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ होणार ही अफवाच असल्याचे सांगितले जात आहे.

आज मुंबईमध्ये एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा दर 912.5 रूपये आहे. दिल्लीमध्ये 913 रूपये आहे. कोलकाता येथे 939 रूपये, चेन्नई येथे 928, अहमदाबाद येथे 920 रूपये, भोपाळ येथे 918 रूपये आहे.  घरगुती गॅस सिलेंडरचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी बंद असल्याने मोठी समस्या निर्माण झाली. भारतात स्थिती चांगली आहे. तेवढ्या प्रमाणात तुटवडा नाहीये.

Follow Us