AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG gas cylinder : एलपीजी गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, नवा नियम लागू, …तर आता सिलिंडरच मिळणार नाही

स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे सध्या भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. नवा नियम तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.

LPG gas cylinder : एलपीजी गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, नवा नियम लागू, ...तर आता सिलिंडरच मिळणार नाही
एलपीजी गॅस सिलिंडरबाबत मोठा निर्णय Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 25, 2026 | 7:44 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील दोन्ही देशांमधील संघर्ष अजूनही सुरूच आहे. अमेरिका आणि इस्त्रायलसोबत युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने आधीच स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यानंतर या ठिकाणी अमेरिकेनं देखील नाकेबंदी केली. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे भारतासह अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. आखाती देशांमधून होणारा कच्चं तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे भारतात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा तुटवडा जणावत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता एलपीजी गॅस सिलिंडरबाबत सरकारकडून एक अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता ज्या लोकांच्या घरात पाइपलाइनच्या माध्यमातून नॅचरल गॅसचा पुरवठा होतो, त्या लोकांना एलपीजी गॅसचं सिलिंडर मिळणार नाहीये.

सरकारकडून आदेश जारी

सोमवारीच यासंदर्भात सरकारच्या वतीने आदेश जारी करण्यात आला आहे. आदेश जारी झाल्यानंतर तात्काळ प्रभावाने या निर्णयाची अमलबजावणी देखील करण्यात आली आहे. नव्या आदेशानुसार आता ज्यांच्या नावावर पीएनजीचं कनेक्शन आहे, अशा लोकांना आता एलपीजीचा पुरवठा करण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. याचाच अर्थ आता एकाच व्यक्तीला एलपीजी आणि पीएनजी असे दोन कनेक्शन मिळणार नाहीयेत. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. गॅसचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी  सरकारकडून काही अत्यावश्यक पाऊलं उचलली जात आहेत, त्याचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

आकडेवारीनुसार भारताला 2025 मध्ये जेवढा एलपीजी गॅसची गरज होती, त्यातील तब्बल 90 टक्के गॅस हा मध्यपूर्वेतून आयात करण्यात आला होता. मात्र आता स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे भारताला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ