आरडाआरोड, किंचाळ्या अन् पळापळ, दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी; 19 जणांचा जीव गेला
Kolkata Pandal Tragedy: कोलकाताच्या दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी झाली आहे. या घटेनेत आतापर्यंत19 जणांचा जीव गेला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

कोलकातामधील दुर्गा पूजा मंडपात शनिवारी सायंकाळी चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना घडली. उत्तर कोलकाताच्या चोरबागन पूजा मंडपात ही भीषण दुर्घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. भीषण दुर्घटनेनंतर चोरबाग पूजा समितीच्या जनरल सेक्रेटरी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत.
पूजा मंडपातील काही लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढून कोलकाता मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपात्कालीन टीम घटनास्थळी पोहोचली. तसेच पूजा समितीच्या पदाधिकारी देखील मदतकार्यासाठी धावले. या घटनेनंतर मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी आणि मुख्य सचिव मनोज अग्रवाल हे रुग्णालयात पोहोचले आहेत. कोलकाता पोलिसांच्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.40 वाजता पावसामुळे सर्व जण एक्झिट गेटच्या दिशेने धावले. क्षणभरात गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. सध्या भाविकांसाठी गेट बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या सूचनेनंतर एका तासासाठी मुख्य गेट देखील बंद करण्यात आला होता.
मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी काय म्हणाले?
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी पूजा मंडपातील चेंगराचेंगरीच्या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. ही संपूर्ण घटना सायंकाळी 7.30 ते 8 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 जण जखमी झाले आहेत. सरकारने आता चेंगराचेंगरीतील जखमींवर उपचार करण्यास प्राधान्य दिलं आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त
राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांनीही दुर्गा पूजा मंडपात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी या घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबायाप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे वाटावे, असे त्यांनी पुढे म्हटले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबाप्रति शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी सदिच्छा व्यक्ती केली आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना 50000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.